अदा शर्मा
मुंबई, 07 मे: ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर ‘ द केरळ स्टोरी ’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एकीकडे अदा शर्माच्या चित्रपटाचे कौतुक करताना दिसले तर दुसरीकडे काही जण ‘द केरळ स्टोरी’ला प्रोपगंडा म्हणत आहे. याच वादावर आता चित्रपटाची लीड अभिनेत्री अदा शर्माने या विषयावर आपले मत मांडले आहे. अदा शर्माचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्या हिंदू ते मुस्लिम बनतात आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होतात. चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळमधील 32,000 महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळेच अनेक जण या चित्रपटाला एका विशिष्ट विचारसरणीच्या बाजूने असलेला चित्रपट म्हणत विरोध करत आहेत. आता यावर चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने सगळ्यांचीच शाळा घेतली आहे.
अदा शर्मा म्हणाली की, ‘काही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहेत. तुम्ही गुगलवर ISIS आणि Brides हे दोन शब्द सर्च करा. यात गोऱ्या लोकांचे म्हणणे ऐकून तुम्हाला हा भारतीय चित्रपट किती खरा आहे हे समजेल.’ अदा शर्माचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिव ठाकरे आधी हे आहेत ‘खतरों के खिलाडी’ चे सर्वात महागडे स्पर्धक; एका एपिसोड साठी घेतलं लाखो रुपये मानधन ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माचे हे ट्विट येताच व्हायरल झाले आहे. अदा शर्माच्या या ट्विटवर यूजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. जिथे अभिनेत्रीचे चाहते तिच्या पोस्टचे समर्थन करताना दिसले. त्यामुळे या ट्विटनंतरही काही लोक चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहेत.
विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आणि प्रकरण न्यायालयातही पोहोचले. पण या सगळ्या गदारोळात ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. ज्याप्रकारे त्याचे शो हाऊसफुल्ल चालले आहेत, ते पाहता अदा शर्माचा हा चित्रपट लवकरच मोठा आकडा गाठू शकतो. केरळ स्टोरी बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 2: ‘द केरळ स्टोरी’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या दोन दिवसांत 19.25 कोटींचा व्यवसाय केला आहे.