JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह, घरातील सदस्यांचे आहेत असे रिपोर्ट

अभिनेत्री सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह, घरातील सदस्यांचे आहेत असे रिपोर्ट

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने सोमवारी एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना अशी माहिती दिली आहे की, तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता अभिनेत्री सारा अली खान (Sara Ani Khan) हिने सोमवारी एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना अशी माहिती दिली आहे की, तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सोमवारी उशीरा रात्री तिने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ड्रायव्हरचा रिपोर्ट येताच तात्काळ त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याबाबत मुंबई महापालिकेला (BMC) ला माहिती देण्यात आली आहे. सारा अली खानने यामध्ये अशी माहिती दिली आहे की, यामध्ये तिच्या परिवारातील सदस्यांचे आणि घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे रिपोर्ट नेगिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व खबरदारी बाळगण्यात येत असल्याचे यावेळी साराने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. (हे वाचा- सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच शेअर केला दोघांचा हा फोटो )

30 जून रोजी सारा अली खान मुंबईमध्ये काही फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. मुंबईतील चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या ऑफिसबाहेर सारा दिसली होती. सारा त्यांच्या बरोबर तिचा नवीन चित्रपट ‘अतरंगी रे’ मध्ये काम करणार आहे. यामध्ये ती धनुष आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर काम करणार आहे. (हे वाचा- महानायकासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार ) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सारा अली खान लवकरच वरूण धवनबरोबर ‘कुली नं 1’ मध्ये दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या