JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / “नाचणारी, ठुमके मारणारी... काय काय बोलायचे लोक”, सपना चौधरीनं सांगितला 13 वर्षातील संघर्ष

“नाचणारी, ठुमके मारणारी... काय काय बोलायचे लोक”, सपना चौधरीनं सांगितला 13 वर्षातील संघर्ष

“एकाचे दहा, दहाचे हजार, हाजराते लाख होईन आणि अशीच हसता हसता एक दिवस राख होऊन जाईन.” सपनाने आपल्या जीवनातील संघर्ष तिच्या चाहत्यांसमोर मांडला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 मे : अभिनेत्री, डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhary) हे नाव आता नाव आता नवं नाही. गेली कित्येक वर्षे सपना आपल्या नृत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सपना बिग बॉस (Big Boss) या प्रसिद्ध टेलिव्हिझन शो मध्ये देखिल दिसली होती. त्यानंतर हरियाणातील ही डान्सर देशभरात प्रसिद्ध झाली. देशातच नव्हे तर देशाबाहेरही आता लोक सपना ला ओळखतात व तिचे कार्यक्रमही होतात. नुकतंच सपनाने आपल्या जीवनातील संघर्ष तिच्या चाहत्यांसमोर मांडला आहे. सपनाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने 13 वर्षातील तिचा संघर्ष सांगितला आहे. आज सपनाकडे सगळं काही आहे, नाव आणि पैसा दोन्ही. पण सपना अजूनही तिचा वाईट काळ विसरली नाही. तिचा सगळा संघर्ष अजूनही तिच्या लक्षात आहे. व त्या वाईट काळात ती आपल्या आईचा, बहिणीचा आणि भावाचा आधार बनली याचा तिला अभिमानही वाटत आहे.

किरण खेर यांची तब्येत बिघडली? अनुपम खेर यांनी Health Update देत केली ही विनंती

सपना ने व्हिडीओत म्हटलं आहे, “खूप काही सहन केलं, आणि खूप काही पाहिलं, या आयुष्याच्या प्रवासाने खूप काही रंग दाखवले. मलापण वाटायचं शाळेत जाऊन शिकून खूप मोठी नोकरी करावी. पण… लहान होते बाबा आजार पडले आणि देवाला प्रिय झाले. नाचणारी, ठुमके मारणारी काय काय नाही बोलयचे लोक. पण माझ्या नाचण्याने माझं घर चालतं. माझ्या आईचा , भावाचा, बहिणीचा उदरनिर्वाह होतो त्यामुळे मला काहीच पर्वा नाही.”

संबंधित बातम्या

पुढे सपनाने आणखीही तिच्या जिवनातील काही कठिण प्रसंग सांगितले आहेत, ती म्हणते, “या जगात मी एकटीच नाचत नाही. इतिहास उघडून पाहा आणि देवाने माढ्या नशिबात तुम्हा सर्वांचं प्रेमच लिहिलं असेल तर जळणाऱ्यांना जळूदेत. मला आजही ती तारिख आठवते 21 डिसेंबर 2008 जेव्हा माझ्या बाबंचं निधन झालं. मी 14 वर्षांची होते, घरात कमावणारं कोणीही नव्हतं. त्यानंतर मी एका वेगळ्या दुनियेत आले. खूप काही पाहिलं या तेरा वर्षांत. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. मी लहान होते तेव्हाच कलाकारी जमातीने मला स्विकारलं. विचार केला होता शिकून मोठी नोकरी करेन पण देवापुढे कोणाचं काय चालत.” आणखीही काही घटना सपनाने या व्हिडीओत सांगितल्या आहेत. तर शेवटी सपना म्हणते, “एकाचे दहा, दहाचे हजार, हाजराते लाख होईन आणि अशीच हसता हसता एक दिवस राख होऊन जाईन.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या