मुंबई 6 जून: अभिनेत्री अमृता सुभाषचा (Amruta Subhash) अभिनयप्रवास फारच रंजक आहे. आधी मालिकांमध्ये दिसणारी अमृता आज वेबसिरीजच्या जगतातली राणी आहे हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे. अमृताचा कोणताही नवा प्रोजेक्ट हा काहीनाकाही वेगळं दाखवणारा असतो आणि त्यात प्रत्येक वेळेला तिचा अभिनय बघण्यासारखाच असतो यात वाद नाही. (Amruta Subhash career) तिचा हा सगळा जीवनप्रवास तिने एका पोस्टमधून व्यक्त केला आहे. काय आहे ही खास पोस्ट? अमृता सुभाष सध्या रंगभूमीवर परतली असून तिचं ‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक नव्या जोमाने पुन्हा सुरु झालं आहे.नाटकाकडे रसिकांची अजूनही ओढ आहे. चांगल्या आणि दर्जेदार नाटकांना अजूनही रसिक गर्दी करतात. सध्या रंगभूमीवर अशी अनेक नाटकं गाजताना दिसत आहेत. नाटकानंतर कलाकारांना आवर्जून भेटून भरभरून दाद देणारे रसिक भेटणं ही कलाकारांसाठी सर्वात मोठी पावती आहे. अमृताला सुद्धा अशाच दर्दी प्रेक्षकांनी येऊन नाटकानंतर शुभेच्छा दिल्या हे तिच्या नुकत्याच टाकलेल्या पोस्टमध्ये कळतं व्हिडिओमध्ये काय म्हणाली अमृता? पुनःश्च हनिमून (Punashcha Honeymoon) या नाटकांच्या ठाण्याला झालेल्या प्रयोगानंतर तिला अनेक प्रेक्षक भेटायला आले होते. तेव्हा एका प्रेक्षकांनी तिच्या फोटोचं कोलाज बनवून आणलं होतं आणि ते तिला भेट म्हणून दिलं. अमृता त्या भेट्वस्तूवर आपली सही देताना दिसत आहे. या सुंदर क्षणाला एका रिलच्या माध्यमातून पोस्ट केलं आहे. याला खास कॅप्शन देत ती असं लिहिते,”मायबाप प्रेक्षक .. मी कृतज्ञ आहे.. माझ्यावर आणि माझ्या कामावर असाच लोभ कायम असू द्यात.. #पुनश्चहनिमून ❤”
अमृताने या खास रिलमधून मायबाप रसिकांचे आभार मानले आहेत. “तुमचं काम मनापासून आवडणारे त्याला दाद देणारे प्रेक्षक भेटत तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. हे खूप खास फीलिंग आहे. माझ्यावर असच प्रेम कायम राहूदे”. ,असं ती लिहिते. हे ही वाचा- Bollywood News : मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरची बाॅलिवुडमध्ये एन्ट्री; प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या OTT चित्रपटांचे करणार दिग्दर्शन : VIDEO
अमृताच्या करिअरची गाडी सुसाट वेगात चालू आहे. सेक्रेड गेम्स, गळी बॉय, बॉंबे बेगम्स, धमाका अशा अनेकानेक गाजलेल्या प्रोजेक्टस्चा अमृता एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सध्या अमृता रंगभूमीकडे परतली आहे हे बघून प्रेक्षकांना आनंद झाला आहेच. तिचा कोणता नवा प्रोजेक्ट समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.