Home /News /maharashtra /

Bollywood News : मराठमोळ्या दिग्दर्शकाची बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; करण जोहरने दिला मोठा ब्रेक, VIDEO

Bollywood News : मराठमोळ्या दिग्दर्शकाची बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; करण जोहरने दिला मोठा ब्रेक, VIDEO

Akshay

Akshay indikar new hindi film with karan johar

मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर आता बाॅलिवुमध्ये (Bollywood News) एन्ट्री करतो आहे. त्याला प्रसिद्ध दिग्दर्शन करण जोहरसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. करण जोहरच्या OTT Platform वरील चित्रपटांचे तो दिग्दर्शन अक्षय करणार आहे.

    पुणे. 6 जून : मराठीतील उत्कृष्ट लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा बहुमान प्राप्त करणारा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर (Akshay Indikar) लवकरच बाॅलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर अक्षयसोबत केलेली खास बातचीत... 'उदाहरणार्थ नेमाडे' या मराठीतील पहिल्या डॉक्यु-फिक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षयने केले होते. त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्यावर शॉर्टफिल्म तयार केली होती. या फिल्मचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. 'त्रिज्या-रेडियस' ही त्याची डेब्यू फीचर फिल्म होती. त्रिज्या चित्रपटला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला आहे. वाचा : ‘आता इतर भाषेतले दिग्दर्शक प्रवीण तरडे सारखे चित्रपट काढा म्हणतील..’ मराठीतील लोकप्रिय गायकाची पोस्ट चर्चेत स्थलपुराण-क्रॉनिकल ऑफ स्पेसचा या त्याच्या चित्रपटाला 70 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. सोलापुरमध्ये जन्मलेल्या आणि अकलूज या छोट्याशा गावात वाढलेल्या अक्षय इंडीकरने चित्रपट शिक्षण पुण्यात पूर्ण केले. या सोबतच सिनेमा लॅबद्वारे अक्षय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांबद्दलची विशेष माहिती सिनेमालाद्वारे अक्षय लोकांपर्यंत पोहोचत असतो. आता अक्षय हा बाॅलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे. त्याला मिळालेल्या संधीचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षयची इंडीकरचे चित्रपट मोठ्या प्रमाणात आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजली आहेत. याची दखल हिंदी बाॅलिवुडनेदेखील घेतलेले आहे. आतापर्यंत त्याला विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. वाचा : ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ रंगणार! सचिन खेडेकर घेऊन येताहेत ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व! आता त्याला हिंदी व्यवसायिक चित्रपटांमध्येदेखील पदार्पण करण्याची विशेष संधी मिळाली आहे. फारच कमी वयामध्ये अक्षयने आपल्या चित्रपटांद्वारे आपल्या मातीशी असलेली आपुलकी नेहमीच अधोरेखित केली आहे. स्थलपुराण असो किंवा त्रिज्या असो... या चित्रपटांद्वारे अक्षयने मूळ मातीपासूनचा प्रवास रसिकांसाठी सादर केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनुराग कश्यप आणि करण जोहरसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी अक्षयच्या कामाची नेहमीच स्तुती केली आहे.
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Karan Johar

    पुढील बातम्या