मुंबई, 07 जुलै: मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकारांची लग्न होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हृता दुर्गुळेचं ( Hruta Durgule) लग्न पार पडलं. अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर ( Akshaya Deodhar) यांचाही साखरपुडा झाला. त्यानंतर आता अभिनेत्री अमृता पवार ( Amruta Pawar Wedding) हिचा लग्नसोहळा पार पडला. अमृता सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ( Tujhya Majhya sansarala Ani Kay Hav) या मालिकेत अदितीची भूमिका साकारत आहे. मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीतीत अमृतानं नवरा नील पाटील याच्या गळ्यात माळ घातली. मोठ्या थाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. मात्र लग्न होताच अमृतानं नवऱ्याला ‘मला सुखात ठेवशील ना?’, असा प्रश्न विचारला आहे. लग्न होताच अभिनेत्रीनं असा प्रश्न का विचारला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अमृता उत्तम अभिनेत्री असली तरी तशी ती फार शांत असते. लग्नातही शांतच दिसली. मात्र लग्नानंतर उखाण्याच्या कार्यक्रमात मात्र अमृतानं सगळीच कसर भरुन काढली. अमृतानं नवऱ्यावर कोणतीही शंका म्हणून नाही तर उखाणा घेत असा मजेशीर प्रश्न विचारला आहे. अमृतानं उखाणा घेत म्हटलंय, ‘पाटलांच्या घरात प्रवेश करुन करणार नवीन संसाराची सुरुवात, नील रावांचं नाव घेते ठेवाल ना मला सुखात?’ अमृताच्या या गोड उखाण्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. अमृता आणि नील दोघेही या उखाण्याच्या कार्यक्रमानंतर एकमेकांकडे बघून गोड हसताना दिसले.
हेही वाचा - गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर अमृताच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तिच्या युनिक उखाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. अमृताला सगळ्यांकडून लग्नाच्या शुभेच्छा येत आहेत. लग्नात अमृतानं केलेल्या पारंपरिक लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं. काही दिवसांआधी अभिनेत्री अक्षया देवधरही उखाण्याचा सराव करताना दिसली होती. लवकरच अक्षया आणि हार्दीक लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे लग्नाआधी पाठक बाई उघाण्याचा दमदार सराव करताना दिसल्या.