बिग बॉस मराठी 4
मुंबई, 2 डिसेंबर : सोशल मीडियावर सगळीकडे ‘बिग बॉस मराठी 4’ चा धुमाकूळ पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. सेलिब्रिटी घरात येऊन स्पर्धकांसोबत अनेक धमाल मस्तीही करताना पहायला मिळतात. याशिवाय घरातील सदस्यांना टास्कही देतात. अशातच बिग बॉस मराठी च्या घरात नवा पाहूणा हजेरी लावणार आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. बिग बॉसच्या आज होणाऱ्या भागात सिद्धार्थ जाधव घरात पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्रामवर याचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसंतय की, सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतो. सिद्धार्थला घरात पाहताच सगळे स्पर्धक खूप खूसृश होतात.अपूर्वा तर मोठ्याने ओरडते ‘ओह माय गॉड सिद्धू’. मात्र सिद्धार्थने घरात आल्यावर स्पर्धकांना एक अशी गोष्ट सांगतिली जे ऐकून स्पर्धकांना धक्काच बसला. सिद्धार्थ म्हणाला, इथून एक्झिट करताना एका स्पर्धकाला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक सिद्धार्थसोबत घराबाहेर पडणार हे आज होणाऱ्या भागात समोर येईल.
अनेक प्रेक्षक व्हिडीओवर कमेंट करत असलेले पहायला मिळत आहे. टेंशन नका घेऊ तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला असेल, कोणीही जाऊदे तेजू मस्त होती’, अशा अनेक कमेंट प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष त्या एका स्पर्धकाकडे लागलं आहे. सिद्धूला घरात पाहताच स्पर्धक आनंदीही आहेत आणि घरातून कोण जाणार यामुळे घाबरलेलेही आहेत.
दरम्यान, नुकतंच बिग बॉसच्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट झाली. तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घराबाहेर गेली आहे, तिला निरोप देताना स्पर्धकही खूप भावुक झाले होते. तेजस्विनीला प्रकृतिच्या कारणामुळे बाहेर जावे लागले असले तरी प्रेक्षकांनी ती परत येण्याची आशा आहे. तिला पुन्हा घरात बोलवा असं सोशल मीडियाद्वारे सांगतिलं जातंय. त्यामुळे आता तेजू पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार का? हा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.