JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मोठ्या भावासारखे माझ्या पाठिशी उभे राहिले'; अभिनेता शरद पोंक्षेंची एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

'मोठ्या भावासारखे माझ्या पाठिशी उभे राहिले'; अभिनेता शरद पोंक्षेंची एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

‘कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा.शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने ऊभे राहीले’, असं शरद पोंक्षे यांनी ट्विट केलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार पेटलेलं आहे. तणाव निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर अनेकजण आपलं मत मांडताना दिसत आहे. अनेक कलाकारही यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. मात्र कधीकधी राजकीय मत मांडल्यामुळे कलाकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असंच काहीसं सध्या अभिनेते शरद पोंक्षे (Sharad ponkshe) यांच्याबाबतीत घडत आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याविषयी केलेल्या पोस्टमुळे सध्या त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सध्या राजकीय वातावरण पेटलं आहे. हे सगळं सुरु असताना शरद पोंक्षे यांची पोस्ट सगळ्यांचं (Sharad Ponkshe post)  लक्ष केंद्रित करत आहे. त्यांची पोस्ट राजकीय नसली तरी सध्या या पोस्टनं गदारोळ निर्माण केला आहे. ‘कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा.शिंदेसाहेब माझ्या पाठिशी खंबीरपणाने उभे राहीले’, असं शरद पोंक्षे यांनी ट्विट केलं आहे. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होत असलेली पहायला मिळत आहे. हेही वाचा - ज्येष्ठ लेखिका शांता गोखलेंना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर; लेक रेणुका शहाणेने शेअर केली खास पोस्ट ‘हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले’, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी त्यांच्या प्रकाशीत झालेल्या पुस्तकाचा फोटो टाकला आहे.  या पुस्तकाचं नाव ‘दुसरं वादळ’ असं आहे. पोंक्षे यांनी त्यांना कर्करोग झाला होता आणि या आजारवर त्यांनी कशा प्रकारे मात केली याविषयी लिहिलं आहे. पोस्ट करत यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीविषयी उल्लेख केला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, ही पोस्ट राजकीय जरी नसली तरी अशा वेळी पोस्ट केली आहे की, राज्यातील वातावरण, सरकार कोसळण्याच्या मार्गावर आलं आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. अभिनेता शदर पोंक्षे यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या भूमिकेचंही अनेकांनी कौतुक केलं आहे. सध्या ते ठिपक्यांची रांगोळी या मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या