Home /News /entertainment /

ज्येष्ठ लेखिका शांता गोखलेंना 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर; लेक रेणुका शहाणेने शेअर केली खास पोस्ट

ज्येष्ठ लेखिका शांता गोखलेंना 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर; लेक रेणुका शहाणेने शेअर केली खास पोस्ट

रेणुका शहाणे (Renuka Shahane) या मराठमोळ्या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. सध्या ही अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सक्रिय झाली आहे. तसेच रेणुका सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, गोड बातमी दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जून-   रेणुका शहाणे   (Renuka Shahane)  या मराठमोळ्या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. सध्या ही अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सक्रिय झाली आहे. तसेच रेणुका सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, गोड बातमी दिली आहे. रेणुका शहाणे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असतात. दरम्यान आज अभिनेत्रीने एक गोड बातमी शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलंय, ''अत्यंत अभिमानस्पद, सांगताना आनंद होत आहे माझ्या प्रतिभावंत आई शांता गोखले यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या "स्मृतिचित्रे" च्या "द मेमोयर्स ऑफ अ स्पिरिटेड वाईफ" मध्ये इंग्रजी अनुवादासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रचंड मोठ्या सन्मानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्काराचे आभार'. असं म्हणत रेणुका यांनी आनंदाची बातमी शेअर केली आहे. (हे वाचा:अनिरुद्धने संजनावर केला गंभीर आरोप; 'आई कुठे काय करते'चा महाएपिसोड ) शांता गोखले या प्रसिद्ध लेखिका, पत्रकार, अनुवादक, नाट्यसमीक्षक आहेत. त्यांचं मराठी-इंग्रजी भाषेवर मोठं प्रभुत्व आहे. त्यांनी अनेक मराठी-इंग्रजी पुस्तकांचं लिखाण केलं आहे. त्यांनाही आपल्या वडिलांवरसुद्धा इंग्रजीमधून फार छान लेखन केलं आहे. त्यांना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोबतच शांता गोखले यांना 'कारकीर्द-गौरव' पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे या त्यांच्या लेक आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या