आरोह वेलणकर ऑन शिव ठाकरे
मुंबई, 11 नोव्हेंबर : बिग बॉस 16 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. मराठमोळा शिव ठाकरे च्या मारहाणीवरून घरात चांगलाच राडा झाला आहे. अर्चना गौतमनं शिव ठाकरेला मारहाण केल्यानं तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे शिव ठाकरे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. बिग बॉस हिंदीमध्ये अशी भांडणं काही नवीन नाहीत. अर्चना आधीही अनेक स्पर्धकांना बिग बॉसनं घराबाहेर काढलं आहे. सध्या शिव ठाकरेबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सगळेच आपली मतं व्यक्त करत आहेत. शिव ठाकरे हा बिग बॉस मराठी 2 चा विजेता आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्येही शिव उत्तमरित्या खेळ खेळला होता. दुसऱ्या सीझनमधील एका स्पर्धकानं शिवबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याची पोस्ट सध्या चर्चे आली आहे. अभिनेता आरोह वेलणकर बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आरोह टॉप 6पर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली. दरम्यान घरात आरोह आणि शिव ठाकरे अनेकदा टास्क दरम्यान समोरा समोर आले होते. त्यावेळी अनेक भांडणं देखील झाली होती. आरोहनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवनं मला मारलं होतं असा आरोप केला आहे. शिवला देखील घराबाहेर काढलं जाईल असं मला वाटलं होतं असंही आरोप म्हणालाय. हेही वाचा - BB16: शिव ठाकरेबरोबर झालेल्या Controversyचा शेफ पराग कान्हेरेशी काय संबंध? आरोहनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं आहे, ‘मागे वळून पाहताना, शिव ठाकरेनं बिग बॉसच्या घरात मला मारलं होतं. तेव्हा त्यालाही घरातून बाहेर काढलं जाईल अशी मला अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. मी त्याला माफ करायला नको होतं. शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक होती. तेव्हा मी निर्दयी व्हायला हवं होतं’.
आरोहच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शिवची बाजू घेतल्याचं दिसत आहे. एका युझरनं, ‘तू तर त्याची मान पकडली होती. विसरलास का. तो चुकीचा असता तर तो विनर नसता’. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘माफी दिली नसतीस तर तू विनर असता का?’
अभिनेता आरोह वेलणकरच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर ‘रेगे’ या सिनेमातून आरोहला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक सिनेमात त्यानं काम केली. त्यानंतर तो थेट बिग बॉस मराठी 2मध्ये दिसला. टॉप 6मध्ये जाऊन आरोह बिग बॉसमधून आऊट झाला. घरातून बाहेर आल्यानंतर आरोहनं फनरल सारखा सिनेमा केला. ज्या सिनेमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.