JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिजित बिचुकलेची Bigg Boss 15 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एंट्री

अभिजित बिचुकलेची Bigg Boss 15 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एंट्री

‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) चा दिवसेंदिवस टीआरपी घसरत आहे. आता शोला अधिक रंजक बनवण्यासाठी व शोचा टीआरपी उंचवण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 नोव्हेंबर- ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) चा दिवसेंदिवस टीआरपी घसरत आहे. आता शोला अधिक रंजक बनवण्यासाठी व शोचा टीआरपी उंचवण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) होणार आहे. एक-दोन नव्हे तर अनेक स्पर्धक घरात येणार आहेत. यापैकी सर्वात चर्चेत आणि फेमस नाव ‘बिग बॉस मराठी २’ चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याचे आहे. बिचुकलेने मराठीत तर धुमाकूळ घातलाच होता पण आता सलमानच्या पुढे बिचुकले **(abhijeet bichukale )**कसा वागणार किंवा त्याचा खेळ कसा असणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अभिजीत बिचुकले घरात कोणता धमाका कसा वागणार, त्याचा खेळ कसा असेल, बिचुकले हिंदी बिग बॉसमध्ये टिकू शकतील का, त्याच्या येण्याने टीआरपीमध्ये किती फरक पडेल, या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. वाचा : अंकिता लोखंडेसाठी ‘या’ दोन मराठी अभिनेत्री करताहेत केळवणचा प्लान डोनल बिष्ट, विधी पांड्या व्यतिरिक्त बिग बॉस ओटीटीचा भाग असलेले जिशान खान आणि अक्षरा सिंह देखील घरात प्रवेश करणार असल्याची बातमी आहे. याशिवाय बिग बॉस 15’ मध्ये खळबळ माजवणारी गायिका अफसाना खानची पुन्हा एंट्री होऊ शकते. काही दिवसांपूर्वी बिग बॉसने अफसानाला शिक्षा म्हणून बेघर केले होते. अशा परिस्थितीत अनेक वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये या गायकाचेही नाव असल्याची बातमी येत आहे. वाचा : KBC 13 लहानग्या स्पर्धकानं केली बिग बींची बोलती बंद! त्यानंतर काय झालं? अभिजित बिचुकले कोण आहे? अभिजित बिचुकले हा पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे राहतो. त्यानं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आजवर अनेक स्टंट केले आहेत. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरताना अनामत रक्कम भरली जाते. या लोकसभा निवडणुकीत त्यानं अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यानं अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या