आई कुठे काय करते
मुंबई, 14 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धचा खरा चेहरा अखेर वीणासमोर आला आहे. वीणाचा मोबाईल चोरून तिला ब्लॅकमेल करणारा हा अनिरुद्धच होता हे सत्य अखेर संजनाने उघड केलं. अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात आग लावणाऱ्या अनिरुद्धचा तोरा चांगलाच उतरला आहे. पण कोणत्याही गोष्टीत कमीपणा घेऊन माफी मागेल तो अनिरुद्ध कसला. मागील भागात आपण पाहिलं की, अरुंधती ही देशमुखांच्या घरात अनिरुद्धच्या कानाखाली मारते. अनिरुद्धची लायकी त्याला दाखवून देते. इतकंच काय तर संजना देखील अनिरुद्धला खडसावते. आता या सगळ्या अपमानाचा बदला अनिरुद्ध घेणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार? पाहूयात. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्धचं खरं रुप वीणासमोर येतं. पण तरीही या सगळ्यावर विश्वास ठेवायला वीणा तयार होत नाही. पण अनिरुद्धला गाफिल ठेवून वीणा मात्र त्याला चांगला इंगा दाखवून देणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, वीणा अनिरुद्धला त्याच्या बिझनेसमधून बेदखल करते. मालिकेच्या प्रोमो समोर आला आहे ज्यात वीणा अनिरुद्धला भेटायला बोलावते आणि त्याच्या हातात एक फाइल देत, “तू आजपासून माझ्या कंपनीत माझा पार्टनर नाहीयेस. मी आजपासून अनिरुद्ध देशमुख नावाच्या माणसाला माझ्या बिझनेसमधून टर्मिनेट करतेय”, असं सांगते. हेही वाचा - अखेर देशमुखांची दुसरी सूनही जाणार घराबाहेर; कांचनने घेतला मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट
वीणाने बिझनेस पार्टनर्शिप तोडल्याचा राग घेऊन अनिरुद्ध घरी येतो. पण एक प्लान फसला म्हणून आता अनिरुद्ध त्याचा नवा प्लान ऑन करणार आहे. देशमुखांच्या घरी कांचन इशा आणि अनिश यांच्या लग्नाची तयारी करत असते. अनिरुद्ध घरी जातो तेव्हा संजना सांगते, “आई गुरूजींकडे गेल्यात. त्यांचा फोन आलाय. एखादा चांगला मुहूर्त बघून अनिश आणि इशाचं लग्न करूया”. त्याचवेळेस अनिरुद्ध मध्ये पडून “इशा आणि अनिशचं लग्न होत नाहीये. ते मी होऊ देणार नाही”, असं सांगतो.
इतके दिवस अरुंधतीने केलेल्या अपमानाचा बदल घेण्यासाठी अनिरुद्ध तिच्या संसारात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या भांडणात आता तो त्याच्या मुलीला देखील पणाला लावताना दिसणार आहे. अनिरुद्धची ही नवी खेळी सफल होणार का? कांचन आणि वीणा यावर काय प्रतिक्रिया देणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.