JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / '...म्हणजे काय दुधावरची साय' रूपाली भोसलेची खास व्यक्तीसाठी खास पोस्ट

'...म्हणजे काय दुधावरची साय' रूपाली भोसलेची खास व्यक्तीसाठी खास पोस्ट

रूपालीनं तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोबत एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 11 मे-**आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येत कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेत संजनाची भूनिका अभिनेत्री रूपाली भोसले (rupali bhosle) साकारताना दिसते. संजनाची भूमिका नकारात्मक असली तरी संजनाचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. रूपालीनं तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोबत एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. रूपाली भोसलेच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून तिची आजी आहे. आजीच्या कुशीतला तिचा एक सुंदर फोटो इन्स्टाला शेअर केला आहे. या सुंदरा फोटोला सुंदर देखील कॅप्शन दिली आहे. आजी म्हणजे काय दुधावरची साय..!!.असं तिनं आजीसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे.आजी आणि नातीचं मुळात नातचं खास असतं. रूपालीचं देखील तिच्या आजीसोबतचं बॉन्डिंग या फोटोत दिसत आहे. अनेक्यांनी तिच्या या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. वाचा- धनश्री काडगावकरचा साडीत पाहायला मिळाला सुपर स्वॅग, ग्लॅमरस फोटोंनी वेधलं लक्ष! रूपाली भोसलेनं सध्या आई कुठे मालिकेतून ब्रेक घेतला आहे. सध्या ती कोकण ट्रीपचा आनंद घेत आहे. याकाळात ती विविध ठिकाणी भेट देत आहे. कोकण ट्रीपचे तिनं काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या कुंटुबासोबत ती ट्रीपचा आनंद घेत आहे. यावेळीचं तिनं तिच्या आजीची भेट घेतल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने देखील तिला खेडला का कुठे…..असं म्हणत याविषयी विचारलं आहे. वाचा- VIDEO: धर्मवीर ट्रेलर लाँचवेळी सलमानने स्टेजवर का काढले शूज? चाहते करतायंत कौतुक बिग बॉस मराठीमुळे रूपाली भोसले नाव चर्चेत आलं. मात्र आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे रूपालीला लोकप्रियता व एक वेगळी ओळख मिळाली. आज तिला संजना या नावाने ओळखतात खरं तर ही तिच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

संबंधित बातम्या

आई कुठे काय करते मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. संजनाने नुकताच झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता ती सुखरूप आहे. आता हा एक ट्वीस्ट कमी होता की काय तोवर मालिकेत आशुतोषचा अपघात झाला आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या