JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, क्यूट व्हिडिओत दिसला दोघींचा प्रेमळ अंदाज

'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, क्यूट व्हिडिओत दिसला दोघींचा प्रेमळ अंदाज

आई कुठे काय करते फेममधुराणी प्रभुलकर खऱ्या आयुष्यात देखील एका मुलीची आई आहे. अनेकदा ती मुलीसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिनं तिच्या लेकीसोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मे- छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ( Aai kuthe kay karte ) ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मालिकेतील प्रत्येक कलाकरांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेचे कथानक अरुंधती भोवती फिरताना दिसते. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar )  साकारताना दिसते. मालिकेत ती आईची भूमिका साकारताना दिसते आहे. खऱ्या आयुष्यात देखील मधुराणी प्रभुलकर एका मुलीची आई आहे. अनेकदा ती मुलीसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिनं तिच्या लेकीसोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत या दोघींमध्ये म्हणजे माय लेकींमध्ये असलेलं प्रेम पाहून चाहते देखील आनंदी  **(Madhurani prabhulkar latest Video )**झाले आहेत. सध्या हा व्हि़जिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मधुराणीनं मागच्या काही दिवसांपासून तिच्या लेकीसोबत महाबळेश्वरमध्ये लेकीसोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिनं तिच्या लेकीसोबतचे काही व्हिडिओ व फोटो देखील पोस्ट केले आहेत. आता देखील तिनं एक असाच लेकीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मधुराणीला तिची लेक काहीतरी सांगताना दिसत आहे. मधुराणी देखील ते मनलावून ऐकताना दिसतेय..यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचा आनंद दिसत आहे. शेवटी आईपण काय असतं हे मधुराणीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

संबंधित बातम्या

मधुराणीनं या व्हिडिओला कॅप्शन देखील सुंदर दिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, ती एक मोठी कथाकार आहे..जशी आई तशी मुलगी.. मधुराणीला देखील साहित्याची, पुस्तक वाचणाची व कविता वाचण्याची आवड आहे. अगदी तिच्याप्रमाणेच मुलगी देखील गुंग होऊन आईला काहीतरी सांगताना या व्हिडिओ दिसत आहे. यावरून मधुराणीनं या व्हिडिओला अशी कॅप्शन दिलेली आहे. वाचा- माझी तुझी रेशीमगाठ : छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या. वाचा- ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022’ चा मानकरी ठरला अभिनेता निखिल चव्हाण मधुराणी प्रभुलकरची कविता वाचनाची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकादा सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मधुराणीनं इंदौर वारी केली. इंदौरमध्ये तिनं कविता वाचनांचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला इंदौरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या