JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर…'अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत

'छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर…'अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत

नुकतीच अश्विनी महांगडेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

जाहिरात

ashvini mahangade

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे- अश्विनी महांगडे एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती सामाजिक कार्यात देखील तितकीच सक्रीय असते. अश्विनी सोशल मीडियावर देखील चांगली सक्रीय असते. तिच्या कामाबद्दल अपडेट शेअर करत असते. नुकतीच तिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार परिधान करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा….⛳ 🙏 वाचा- उत्कर्ष शिंदेला टीव्हावर गाताना पाहून आईनं केलं असं काही, Video Viral छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले. त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते. “शौर्यपीठ” कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात. ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत.#धाकलं_धनी #महाराज #छत्रपती #निष्ठा..अश्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.अश्विनी महांगडेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. याआधी अश्विनीने झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब या भूमिकेत दिसली होती. भूमिका कोणतीही असो अश्विनी तिच्या अभिनय कौशल्याने ती आपलीशी करते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

संबंधित बातम्या

या मालिकेमुळे अश्विनी घराघरात राणू अक्का म्हणून लोकप्रिय झाली होती. याशिवाय अश्विनीने ‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. अश्विनीची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. ती फक्त अभिनेत्रीच नाही तर एक समाजसेविका देखील आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अश्विनी एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अश्विनी नुकतीच महाराष्ट्र शाहीर या सिनेमात दिसली. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या