JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: आशुतोष बनणार अरुंधतीच्या मुलांचा बाप; आत्महत्या करणाऱ्या यशला असं वाचवणार

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष बनणार अरुंधतीच्या मुलांचा बाप; आत्महत्या करणाऱ्या यशला असं वाचवणार

आशुतोष अरुंधतीच्या मुलांच्या पाठिशी ठामपणे उभा राहताना दिसणार आहे. काय घडणार मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहूया.

जाहिरात

आई कुठे काय करते एपिसोड अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती गाण्याच्या कार्यक्रमासाठी विदेशात गेली आहे. देशमुखांच्या घरी इशा आणि अनिशच्या साखरपुड्यामुळे सगळे आनंदी असतात. अरुंधती विदेशात गेली असता इकडे देशमुखांच्या घरात मात्र अघटीत घडणार आहे. मगील अनेक दिवस यश गौरीबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे अपसेट असतो. त्याची मानसिक स्थिती ढासळलेली असते. याच ठिकाणी मालिका नवं वळण घेणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात यश आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसणार आहे. यशच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे देशमुख कुटुंब हादरून जाणार आहे. या परिस्थितीत मात्र आशुतोष अरुंधतीच्या मुलांच्या पाठिशी ठामपणे उभा राहताना दिसणार आहे. काय घडणार मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहूया. यश मागील अनेक दिवस डिस्टर्ब असतो. इशा आणि अनिशच्या साखरपुड्यात देखील तो नाराज दिसला. अनिशबरोबर काम करत असतानाही त्याचं लक्ष लागत नसतं. तो सर्वांपासून अलिप्त राहू लागला होता. अशातच अरुंधती देखील काही दिवसांसाठी त्याच्यापासून दूर गेली आहे. एकट्या पडलेला यश अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आला आहे ज्यात आशुतोष यशवर लागलेल्या आत्महत्येच्या गुन्हातून त्याला सोडवतो. हेही वाचा -  ‘12-15 तासांच्या शूटिंग नंतर…’ : असा आहे अरुंधतीच्या लेकाचा रिअल लाइफ फिटनेस फंडा मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात पोलीस यशला घेऊन देशमुखांच्या घरी येतात. यशला हात पाय आणि डोक्याला मार लागलेला असतो. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. आत्महत्येचा प्रयत्न करणं गुन्हा असल्याने पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करतात.  प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की, पोलीस यशला घेऊन येतात आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्याच्यावर 309 हा कलम दाखल झाल्याचं सांगतात. हे ऐकून सगळेच घाबरतात. तेवढ्यात आशुतोष धावत पळत येतो आणि यशला आत्महत्येच्या आरोपातून डिस्चार्ज करण्यात आल्याचं सांगतो.

संबंधित बातम्या

आशुतोष यशला पुन्हा एकदा मोठ्या संकटातून वाचवतो. त्याने केलेल्या कामामुळे कांचन भावुक होते. “आशुतोष राव तुम्ही या मुलांचे वडील जरी नसलात तरी पालक नक्कीच आहात”, असं म्हणते. आप्पा देखील आशुतोषचे हात जोडून आभार मानतात.   कांचनच्या या बोलण्याचा अनिरुद्धला मात्र राग येतो.

आशुतोष आपल्या मुलाचा पालक होत असल्याचं पाहून अनिरुद्ध काय करणार? त्याचप्रमाणे यशने नेमकं काय केलं ?  हा संपूर्ण प्रकार अरुंधतीला समजणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या