आई कुठे काय करते एपिसोड अपडेट
मुंबई, 19 मे : आई कुठे काय करते मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरू आहे. मालिकेत अनेक पॉझिटिव्ह गोष्टी पाहायला मिळत आहेत. अनिश आणि इशाच्या साखरपुड्यानंतर काहीसं हलक फुलक वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेत वीणाची एंट्री झाली आहे. वीणाच्या एंट्रीनं मालिकेला नवं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अरुंधतीच्या आयुष्यात नव्या घडामोडी घडणार आहेत. आशुतोषबरोबर लग्न करून अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचे दिवस आलेत. त्यानंतर आता आणखी मोठी घडामोड अरुंधतीच्या आयुष्यात घडणार आहे. अरुंधती दोन्ही कुटुंबांना एका सुखद धक्का देणार आहे. काय घडणार मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहूयात. इशा आणि अनिशच्या साखरपुड्याची गडबड काही दिवस मालिकेत सुरू होती. दोघांचा साखरपुडा निर्विघ्न पार पडला. दोघांच्या साखरपुड्यात वीणाची एंट्री झाली. वीणा ही आशुतोषची मानलेली बहिण असल्यानं वीणाच्या रुपाने अरुंधतीला नवी नणंद मिळाली. वीणाच्या येण्यानं सुलेखा ताई देखील खुश होतात. इशा आणि अनिशच्या साखरपुड्यात सगळे धम्माल करतात. हेही वाचा - राज ठाकरेंनी बॅकस्टेजमधून पाहिलं होतं ‘सही रे सही’ नाटकं; अनेक वर्षांनी समोर आला ‘तो’ प्रसंग साखरपुड्यानंतर आता मालिकेत नवं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधतीला सुखद धक्का बसणार आहे. आशुतोषबरोबर सुरू झालेल्या नव्या संसारात आणखी एक नवा आनंद तिला मिळणार आहे. अरुंधतीला विदेशात गाण्याची संधी मिळणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात अरुंधती विदेशात जाणार आहे हे कळल्यानंतर सगळे तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, यश अरुंधतीलासाठी फुलांचा गुच्छ घेऊन येतो आणि तिचं अभिनंदन करतो. आशुतोष तिला तिचं अभिनंदन करण्यामागचं कारण सांगतो. तो म्हणतो, “अरुंधती तुला वर्ल्ड टूरची ऑफर आली आहे. पुढच्या काही दिवसात जगातील प्रतिष्ठीत शहरातील, प्रतिष्ठीत मंचावर तुझं गाणं होणार आहे. अभिनंदन”. अरुंधतीला मिळालेली ही संधी पाहून सगळेत आश्चर्य चकित होतात. वीणा आणि सुलेखा ताई देखील अरुंधतीचं कौतुक करतात.
आपल्याला मिळालेली इतकी मोठी संधी पाहून अरुंधती थोडी भावुक होते. अरुंधती आणि आशुतोष खोलीत बोलत असताना आशुतोष तिला समजावतो. तो अरुंधतीला म्हणतो, “तू इथे लोक तुझ्यासाठी ज्या टाळ्या वाजवतील त्या मी ऐकेन अरुंधती. लोक तुझं कौतुक करतील तेव्हा मला आनंद होईल”. असं म्हणत आशुतोष अरुंधतीला मिठीत घेतो. दोघांचा हा भावुक क्षण पाहण्यासाठी मालिकेचा येणारा एपिसोड पाहणं महत्त्वाचं ठरेल. या प्रोमोवरून असं कळतंय की मालिकेच्या पुढच्या काही भागात अरुंधती दिसणार नाहीये. प्रत्यक्षात अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर लेकीबरोबर सुट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रिपवर गेली आहे. मधुराणीनं सध्या मालिकेतून सुट्टी घेतल्यानं मालिकेतील अरुंधती देखील विदेशात गेल्याचं दाखवण्यात येणार आहे.