आई कुठे काय करते
मुंबई, 04 जुलै : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या वीणा केंद्रस्थानी आहे. वीणाच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय झालं आहे हे अरुंधतीला कळलं आहे. वीणाला त्रास देण्यासाठी अनिरुद्धनं नवी खेळी खेळण्यास सुरूवात केली होती. मात्र अनिरुद्धचा डाव त्याच्यावरच उधळणार आहे. मागील भागात आपण पाहिलं की अनिरुद्ध वीणाचा मोबाईल चोरतो आणि त्यातील माहितीचा वापर करून वीणाला ब्लॅकमेल करतो. वीणाला नेमकं कोण त्रास देतंय याचा शोध सगळे घेत असताना अखेर संजनाच अनिरुद्धचं कारस्थान उघडं पाडणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार पाहूयात. वीणा तिच्या आणि अमनच्या नात्याविषयी अरुंधतीला सगळं सांगते. त्यात तिचा जुना फोन हरवल्याने ती अस्वस्थ असते. इकडे अनिरुद्ध वीणाचा फोन कपाटात लपवून ठेवतो आणि नेमका निखिल तो फोन पाहतो आणि संजना सांगतो. दुसऱ्या दिवशी संजना अनिरुद्धला तुझ्याकडे नवीन फोन कुठून आला असं विचारते. त्यावर अनिरुद्ध तिला फोन दाखवतो आणि बघ म्हणतो. संजना फोन घेणार नाही असा खोटा विश्वास असणारा अनिरुद्धला तोंडावर पाडतो. संजना अनिरुद्धच्या हातात असलेला वीणाचा फोन तपासते. हेही वाचा - आधी नवऱ्याचा पाय फ्रँक्चर आता अभिनेत्रीची तब्येत बिघडली; सोडावी लागली मालिका, Video इकडे आपलं कारस्थान उघडं पडू नये म्हणून अनिरुद्ध वीणाला घोळात घेऊन मी तुझी मदत करत असल्याचं सांगतो. तो वीणाकडून तिच्या जुन्या मोबाईलचा नंबर मिळवतो आणि खोटा फोन करून कोणीतरी आपल्याशी बोलल्याचं वीणाला सांगतो. हे ऐकून वीणा अजून घाबरते.
आपलं कारस्थान कोणालाही कळणार नाही असं वाटणाऱ्या अनिरुद्धचं कारस्थान अखेरच संजनाचं उघड करते. अनिरुद्ध देशमुखांकडे येते तेव्हा संजना तिला अनिरुद्धकडे दुसरा फोन असल्याचं सांगते. संजना अरुंधतीला, “वीणाने अनिरुद्धला दुसरा फोन दिला आहे का?” असं विचारते. “काल निखिलला अनिरुद्धकडे एक दुसरा मोबाईल सापडला. अनिरुद्धने तो मोबाईल कपाटात लपवून ठेवला होता”, असंही सांगते. संजनाचं हे बोलणं ऐकून अरुंधतीची शंका खरी ठरते.
येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अरुंधती अनिरुद्धच्या कानाखाली वाजवते. वीणाच्या ऑफिसच्या जागेतील घोटाळा आणि तिचा मोबाईल चोरल्याचं वीणाला समजतं आणि ती देखील अनिरुद्धच्या चुकीचा पाढा वाचत त्याच्या कानाखाली मारते. पण कहाणीत ट्विस्ट येतो आणि अनिरुद्ध स्वप्नातून जागा होता. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अनिरुद्धचं हे स्वप्न खरं ठरणार का? अरुंधती वीणाला अनिरुद्धबद्दल सांगू शकेल की अनिरुद्ध त्याचा डावा साध्य करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.