JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Kart : देशमुखांनंतर केळकरांच्या घरावर हल्ला; वीणाचा भूतकाळ येणार समोर?

Aai Kuthe Kay Kart : देशमुखांनंतर केळकरांच्या घरावर हल्ला; वीणाचा भूतकाळ येणार समोर?

मालिकेचा प्रोमो समोर आला आहे ज्यात अरुंधती आणि सुलेखा ताई वीणा समजावर असतात तेवढ्यात खिडकीची काच फोडून एक दगड आत येतो.

जाहिरात

आई कुठे काय करते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून : आई कुठे काय करते मालिका सध्या नव्या वळणार आहे. वीणाच्या एंट्रीनंतर मालिकेतील काही गणितं बदलली आहेत. वीणा अचानक केळकरांच्या घरी का आली याचा कोणाला थांगपत्ता लागत नाहीये.  पण वीणा कोणत्यातरी संकटातून बाहेर आली आहे याता अंदाज अरुंधती आणि आशुतोष यांना आहे. मागील भागात आपण पाहिलं की वीणा आणि अनिरुद्ध गाडीतून जात असताना अचानक वीणाचा फोन वाजतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. वीणा पूर्णपणे बिथरते. मागच्या काही भागात कांचनमुळे देशमुखांच्या घरात हल्ला होतो आता केळकरांच्या घरी वीणामुळे संकट येणार आहे. येणाऱ्या भागात केळकरांच्या घरावर दगडफेक होताना पाहायला मिळणार आहे. नेमकं काय घडणार येणाऱ्या भागात पाहूयात. वीणा हट्ट करून अरुंधती आणि सुलेखा ताईंना भर उन्हात पाणीपुरी खाण्यासाठी नेतात. त्यानंतर वीणाच्या फोनवर एक मेसेज येतो आणि ती पुन्हा बिथरते. दोघींना घरी येऊन येते. घरी येताच वीणा खूप बिथरते. वीणा अशी का वागतेय हे कोणाच्यात लक्षात येत नाहीत. अरुंधती वीणाला शांत  होण्यासाठी सांगते. पण वीणा प्रचंड हायपर झालेली असताना दरम्यान याच वेळी केळकरांच्या घरावर हल्ला होता. हेही वाचा -  आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीनं दिली प्रेमाची कबुली; रोमँटिक व्हिडीओ शेअर करत म्हणाली ‘प्रेम या शब्दाला…’ मालिकेचा प्रोमो समोर आला आहे ज्यात अरुंधती आणि सुलेखा ताई वीणा समजावर असतात तेवढ्यात खिडकीची काच फोडून एक दगड आत येतो. अनिश आणि नितीन खिडकीत कोण आहे हे पाहण्यासाठी जातात तितक्यात दारावर कोणीतरी मोठ्याने आदळतं. घरावर कोणीतरी हल्ला करतंय हे कळताच वीणा आणखी हायपर होते. नक्की काय होतंय हे कोणाच्याच लक्षात येत नाही.

संबंधित बातम्या

दरवाजा बाहेरून कोणीतरी मोठ्याने आदळत असताना नितीन अनिशला घरातून काठी घेऊन यायला सांगतो. नितीन हातात काठी घेऊन दाराच्या एका बाजूला उभा राहतो आणि एका बाजूने अनिश दरवाजा उघडतो. दरवाजा उघडताच नितीन हातातल्या काठिने हल्ला करायला जाताच एक व्यक्ती समोर येते जिला पाहून सगळेच घाबरतात.

केळकरांच्या घरावर हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे हे आता येणाऱ्या भागात पाहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. त्याचप्रमाणे वीणाला नेमका कोणाचा मेसेज आला ज्याने ती इतकी बिथरली. घरात इतकं मोठं संकट आल्यानंतर तरी वीणा तिचा भूतकाळ केळकरांना सांगणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या