मुंबई,21 एप्रिल- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी फारच उत्सुक असतात. याच कारणामुळे मालिका टीआरपी रेसमध्ये सतत पुढे असते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनिरुद्धच्या घरावरून वादविवाद सुरु होते. दरम्यान संजनाने फ्रॉड करत हे घर आपल्या नावावर करत सर्वानांच धक्का दिला होता.त्यामुळे तिला अटकही करण्यात आली होती. या सर्व प्रकरणातून बाहेर येत आता मालिकेत सुखाचे काही क्षण पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड चर्चेत असते. मालिकेत कधी कोणता ट्विस्ट येईल सांगणं कठीण असतं. त्यामुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना उत्सुकता लागलेली असते. संजना आयुष्यात आल्यानंतर अनिरुद्ध पूर्ण बदलून गेला होता. इतकंच नव्हे तर त्याने घटस्फोट देत अरुंधतीला आपल्यापासून विभक्त केलं होतं. शिवाय अनिरुद्ध संजनावर विश्वास ठेऊन अरुंधतीवर वाटेल ते आरोपसुद्धा करताना दिसला होता. मात्र आता मालिकेत नवा वळण पाहायला मिळत आहे. मालिकेत अनिरुद्ध काहीसा बदललेला दिसून येत आहे. अरुंधतीला निस्वार्थपणे आपल्या आईबाबांसाठी, मुलांसाठी, घरासाठी लढताना पाहून त्याच्यात काहीतरी फरक जाणवत आहे. अरुंधतीबद्दल त्याच्या मनात पुन्हा काही भावना निर्माण होताना दिसून येत आहेत. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हा भाग पाहायला मिळाला. त्यामुळे मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये देशमुख कुटुंबात जंगी सेलिब्रेशन सुरु आहे. खरं तर कांचन आईंच्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन आहे. यावेळी अरुंधतीसुद्धा उपस्थित आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध अरुंधतीचे आभार मानताना दिसत आहे. तिच्यामुळे आज हा आनंद आपल्या घरी आल्याचं त्याने मान्य केलं आहे. शिवाय फॅमिली फोटो काढत असताना अनिरुद्ध संजना ऐवजी अरुंधतीला येण्यास सांगतो. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार? याची सर्वानांच उत्सुकता आहे.