JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte मालिकेत हायव्होल्टेज ड्रामा, आधी आशुतोषनं मारली नितीनच्या कानाखाली; आता अरुंधती काढणार अनिरुद्धच्या कानाखाली जाळ

Aai Kuthe Kay Karte मालिकेत हायव्होल्टेज ड्रामा, आधी आशुतोषनं मारली नितीनच्या कानाखाली; आता अरुंधती काढणार अनिरुद्धच्या कानाखाली जाळ

Aai Kuthe Kay karte : अनिरुद्धच्या दोन्ही बायको त्याला त्याची जागा दाखवून देताना दिसणार आहेत. मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार? पाहूयात.

जाहिरात

आई कुठे काय करते एपिसोड अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. मालिकेची कथा आणि त्यातील पात्र काहीशी वेगळं वळणं घेताना दिसत आहेत. मालिकेत वीणाची एंट्री झाल्यानंतर सगळी गणितं बदलताना दिसत आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय की, वीणाचा मोबाईल हरवल्याचा फायदा घेऊन अनिरुद्धनं त्याचा डाव साधला आहे. आधी अरुंधती आणि आशुतोष यांच्यात भांडणं लावलं आणि त्यानंतर नितीनवर मोबाईल चोरल्याचा खोटा आरोप लावला. बहिणीच्या चिंतेमुळे कासावीस झालेला आशुतोष तिथल्या तिथे आपल्या जिवलग मित्राच्या कानाखाली लगावतो. पण आता अनिरुद्धच्या दोन्ही बायको त्याला त्याची जागा दाखवून देताना दिसणार आहेत. मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार? पाहूयात. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्ध हा वीणाचा फोन नितीनच्या ड्रावरमध्ये ठेवतो. अनिरुद्ध वीणाच्या मोबाईलचं लोकेशन ऑफिसमध्ये असल्याचं सांगून सगळ्यांना संपूर्ण ऑफिसभर फिरवतो. शेवटी सगळ्यांनी नितीनच्या केबीनमध्ये येऊन मुद्दाम हरवलेल्या मोबाईलवर फोन लावतो. अशा रितीनं अनिरुद्धचा डाव सक्सेस होतो. नितीनच्या ड्राव्हरमध्ये वीणाचा फोन पाहून आशुतोष नितीनच्या कानाखाली मारतो आणि तिथून आता मालिकेतील हाय व्होलेटेज ड्रामाला सुरूवात झाली आहे. हेही वाचा - ‘पोरी मला काम दे’; मराठी अभिनेत्यावर आली युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ, Video

संबंधित बातम्या

नितीननं काहीही केल नसल्याचा विश्वास अरुंधतीला असतो. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, अरुंधती, आशुतोष, नितीन आणि वीणा देशमुखांकडे येतात. तिथे अनिरुद्ध नितीनबद्दल वाईट बोलण्यास सुरूवात करतो. “नितीन शाह, या माणसाने वीणाला छळलंय. या माणसाला आज मी धक्के मारून माझ्या घरातून बाहेर काढणार” असं म्हणत अनिरुद्ध नितीनचा हात धरतो. तोच अरुंधती मध्ये पडून अनिरुंद्धच्या कानाखाली मारते. अनिरुंधतीच्या या कृतीवर अनिरुद्ध तिला मारण्यासाठी पुन्हा हात उचलतो. अरुंधती त्याचा हात धरून बाजूला सारते आणि “एकाही नात्याचं पावित्र्य तुम्हाला जपता आलं नाही म्हणून इतरांच्या नात्यात विष कालवायला निघालात” म्हणत त्याला चांगलेच खडे बोल सुनावते.

अरुंधतीच्या या प्रसंगात आता तिला संजना देखील साथ देणार आहे. अनिरुद्ध विरोधात पुरावे शोधण्यासाठी संजना मदत करणार आहे. एकीकडे पहिल्या पत्नीने अनिरुद्धला त्याची जागा दाखवून दिली आहे तर दुसरीकडे आता दुसरी पत्नी देखील त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. याच वळणार मालिकेत काय काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या