JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 72 Hoorain च्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल; मुस्लिम समाजाने दिग्दर्शकांवर केलाय 'हा' आरोप

72 Hoorain च्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल; मुस्लिम समाजाने दिग्दर्शकांवर केलाय 'हा' आरोप

दहशतवादावर भाष्य करणाऱ्या ‘72 हुरें’ या सिनेमाला अनेक जण विरोध करत आहेत. दरम्यान या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात

72 हूरें

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जुलै :  ‘द केरला स्टोरी’ सारखाच अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘72 हूरें’ असं या चित्रपटाचं नाव असून तो लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय पूरन सिंह चौहान यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आतंकवादावर भाष्य करणारा आहे.  सिनेमाचा पहिला टीझर 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासून चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. ‘72 हूरें’ चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी रिलीज झाला होता आणि तो 7 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, ‘72 हुरें’ चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘72 हूरें’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शनाविरोधात मुंबईत तक्रार करण्यात आली असून या चित्रपटात मुस्लिम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ‘72 हूरें’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात ‘72 हूरें’  चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, चित्रपटात मुस्लिम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सय्यद आरिफ अली यांनी ‘72 हूरें’ चित्रपटाबाबत एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरनुसार चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान आणि निर्माते अशोक पंडित, गुलाबसिंग तंवर, अनिरुद्ध तंवर आणि किरण डागर यांच्यावर धर्माचा अपमान आणि विशिष्ट समुदायाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट प्रचाराद्वारे पैसे कमावल्याचा आरोपही मेकर्सवर करण्यात आला आहे. मुस्लिम आईबापांच्या पोटी जन्म तरी हिंदू म्हणून मिळवली प्रसिद्धी; आयुष्यभर एकटीच राहिली अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांच्या ‘72 हूरें’ या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी प्रदर्शित झाला. दहशतवादाचा काळा चेहरा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दहशतवादी निष्पाप लोकांना खोट्याच्या जाळ्यात कसे अडकवतात आणि धर्माच्या नावाखाली त्यांचा बळी देतात हे दाखवण्यात आले आहे. दहशतवादावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला अनेक जण विरोध करताना दिसून आले. या  टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिद सईद आणि सादिक सईद यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा या चित्रपटाबाबत केला जात आहे. ‘72 हूरें’ हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या