मुंबई 26 जुलै: मुंबईमध्ये 26 जुलै 2005 दिवशी झालेला भयानक पाऊस आजही मुंबईकरांच्या लक्षात आहे. अचानक आलेल्या या पावसाने मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत केलंच पण त्याचसोबत अनेक भयानक आठवणी सुद्धा हा पाऊस अनेकांना देऊन गेला. पण मराठी सिनेसृष्टीत एक असं दाम्पत्य आहे ज्यांनी या दिवशी मुंबईकरांच्या मदतीला धावून जात त्यांना दिलासा देण्याचं काम केलं होतं. हे दाम्पत्य (atul and geetanjali kulkarni) म्हणजे अतुल आणि गीतांजली कुलकर्णी. अतुल आणि गीतांजली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर हिंदीमध्ये सुद्धा अनेक अप्रतिम प्रोजेक्ट्समध्ये अप्रतिम भूमिका साकारताना दिसत आहेत. अतुल आणि गीतांजली यांनी मुंबईकरांना कोसळणाऱ्या पावसात जाऊन मदत पुरवली होती. याचा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी खुपते तिथे गुप्ते या मुलाखतीच्या कार्यक्रमात सांगितलं आहे. ते असं सांगतात, “26 जुलैचा दिवस हा प्रत्येक मुंबैकराच्या लक्षात राहिलेला दिवस आहे. या दिवशी मी अतुल आणि गीतांजली यांच्या घरी नुकताच आलो आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि अर्थतच पुढचे दोन दिवस मी त्य्नाच्या घरी अडकून पडलो. मात्र अशा कठीण प्रसंगात सुद्धा या दाम्पत्याने रस्त्यावरून चालत घराची वाट धरलेल्या अनेकांना मदत पोहोचवावी यासाठी घरी जो काही शिधा शिल्लक होता त्याचे पदार्थ करून त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला. आणि आळीपाळीने आम्ही अतुलच्या गाडीतून जाऊन जवळपासच्या भागातल्या अनेकांपर्यंत ही मदत पोहोचवली.”
अतुल आणि गीतांजली यांच्या सामाजिक जाणीव आजही जिवंत आहेत याचं उदाहरण म्हणून या आठवणीकडे बघता येईल. ज्या दिवशी रेल्वे आणि सगळी वाहतूक सेवा ठप्प झाल्यावर लोक चालत आपापल्या घरी जायला निघाले होते अशा काळात अतुल आणि त्यांच्या पत्नीने पोहोचवलेली मदत ही उल्लेखनीय आहे. हे ही वाचा- Atul Kulkarni EXCLUSIVE: 17 वर्षांची मैत्री असूनही आमिरने ‘लाल सिंग चढ्ढा’ ची स्क्रिप्ट वाचायला का दिलेला नकार? अतुल आणि गीतांजली हे सामाजिक कार्यात बरेच सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सुद्धा दोघे लक्षवेधी कामगिरी करत असतात. नुकतच अतुल यांनी News18 लोकमतला दिलेल्या एक्स्क्लुजिव्ह मुलाखतीत त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल खुलासा केला. ते सध्या लाल सिंग चढ्ढा या सिनेमाच्या लेखनासाठी बरेच चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्यांनी अमीर खानशी निगडित अनेक गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत.