सहा महिन्यांपूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता
बीड, 30 नोव्हेंबर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणास तुरुंगवारी घडली. मात्र जामिनावर सुटका झाल्यावर जिच्यामुळे कारागृहात राहावे लागले, तिला घेऊन त्याने पुन्हा पलायन केले. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावात उघडकीस आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस मनोहर नेटके (वय 22) असं या आरोपी तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तुरुंगात रवानगी झाली. मात्र जामिनावर सुटल्यावर त्याच मुलीला त्याने फूस लावून पळवले. (विद्यार्थ्यांचं चक्क शिक्षिकेशी असभ्य वर्तन, पोलिसांनी घेतलं ताब्यात) या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बीडच्या आष्टी ठाण्यात तेजस नेटकेवर पुन्हा एकदा अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान. या घटनेने आष्टी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुलगी पळून गेल्याचा राग अनावर; प्रियकराच्या भावासोबत धक्कादायक कृत्य दरम्यान, बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या आईने आणि भावाने प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारामतीच्या माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीची आई व भावाला अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व मयूर संजय चव्हाण वय 22 वर्ष असे या प्रकरणातील आरोपींची नाव आहेत. (सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली) 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाऊ मयूर चव्हाण व त्याची आई सुनिता चव्हाण हे पुन्हा आपल्या मुलीच्या प्रियकराच्या घरी गेले. मुलाला आमच्यासमोर हजर करा म्हणून दमदाटी करू लागले. याचवेळी मयूर चव्हाण याने प्रियकराचा भाऊ विकास वाबळे याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या घटनेत विकास गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.