JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या, हादरवणारं कारण आलं समोर

सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या, हादरवणारं कारण आलं समोर

4 एप्रिलच्या रात्री भगत आणि वंश यशला घरी घेऊन आले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शहजाद राव, प्रतिनिधी बागपत, 8 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कदायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बड़ौत पोलिसांनी 4 एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडात खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्येमागील अनैसर्गिक बलात्कार असल्याचे कारण सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, मृताच्या लहान भावाने त्याच्या मित्रांच्या मदतीने मोठ्या भावाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्याचबरोबर या घटनेत सहभागी असलेल्या मारेकरी भावाला तसेच त्याच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मोठ्या भावाची हत्या करण्यासाठी एका गुंडाला सुपारी दिली होती. ही धक्कादायक घटना बड़ौत परिसरातील आहे. याठिकाणी मलकपूर गावात 4 एप्रिल रोजी रात्री 12वीत शिकणाऱ्या यशचा मृतदेह गावाबाहेरील राजवाहे पुलाच्या काठावर फेकून देण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांजवळ धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी वंशने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ यश त्याच्याशी गैरवर्तन करायचा आणि विनाकारण मारहाण करायचा. यामुळे तो खूप नाराज असायचा. त्यामुळे वंशने दोन मित्रांसह यशच्या हत्येचा कट रचला. यानुसार मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या गुंड भगतला दीड लाख रुपयांची सुपारी दिली. यानंतर कटानुसार, 4 एप्रिलच्या रात्री भगत आणि वंश यशला घरी घेऊन आले. यावेळी त्यांनी गावाबाहेरील कॅनॉल ट्रॅकवर बसून आधी दारू प्यायली आणि यश नशेत असताना यशवर गोळी झाडून पळ काढला. अतिरिक्त एसपींनी सांगितले की, अनैसर्गिक गैरकृत्य आणि शिवीगाळ यामुळे चिडून धाकट्या भावाची हत्या झाली. पोलिसांनी दुचाकी, पिस्तूल जप्त करून मारेकऱ्यांना अटक करून या प्रकरणाचा छडा लावला आहे. सध्या पोलिसांनी सुपारी घेणाऱ्या भगत आणि वंश या दोघांना अटक केली असून अन्य दोन तरुण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या