JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पोलीस भरती स्वप्नच राहिलं; ठाण्यातील तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं

पोलीस भरती स्वप्नच राहिलं; ठाण्यातील तरुणानं संपवलं आयु्ष्य, सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांची नावं

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना ठाण्यामधून समोर आली आहे.

जाहिरात

ठाण्यात तरुणानं संपवलं आयुष्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 29 जुलै, अजित मांढरे :  भारतीय लष्कर आणि पोलीस दलामध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातून समोर आली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता आपलं करियर संपणार या भीतीमधून नैराश्य आल्यानं या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी या तरुणानं सुसाईड नोट देखील आपल्या आईच्या मोबाईलवर पाठवली आहे. त्यामध्ये काही वाहतूक पोलिसांची नावं असल्याची माहिती समोर  आली आहे.  मनीष उतेकर असं या तरुणाचं नाव आहे.    सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आत्महत्या करणारा तरुण मनीष उतेकर हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहात होता. त्याला पोलीसदल किंवा आर्मीमध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने तयारी देखील सुरू केली होती. तो स्पर्धा परीक्षा देत होता. मात्र या तरुणाने आपल्या राहात्या घरात आईच्या साडीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्यानं खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील आपल्या आईला पाठवली आहे. या सुसाईड नोटमध्ये काही वाहतूक पोलिसांची नावं असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेप्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Crime News: प्रियकरासाठी 60 वर्षीय पतीला कुऱ्हाडीने तोडलं; मग मृतदेहाच्या तुकड्यांसोबत केलं धक्कादायक

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं?  मनीष याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवर एक सुसाईड नोट पाठवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यानं म्हटलं की, गटारी अमावस्याच्या दिवशी त्याने त्याच्या काही मित्रांसोबत मद्यपान केलं. त्यानंतर मद्यपान करून वाहनं चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवलं. त्याच्याविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दोन दिवस पोलिसांना गुन्हा मागे घेण्याची विनंती केली तसेच दंड भरतो म्हणून सांगितले देखील, मात्र पोलिसांनी त्याला कोर्टात जाण्यास सांगितले. कोर्टात गेल्यास करिअर संपेल या भीतामधून त्याने आत्महत्या केली. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ करिअर बरबाद करणार अशी धमकी दिल्याचा दावाही या सुसाईड नोटमध्ये त्याने केला आहे. या प्रकरणात काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नावं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहीली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या