JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / भंडारा: स्वतःच्याच दारूच्या व्यसनाला कंटाळला तरूण; उचललं धक्कादायक पाऊल

भंडारा: स्वतःच्याच दारूच्या व्यसनाला कंटाळला तरूण; उचललं धक्कादायक पाऊल

भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात या तरुणाने उडी घेतली. रोशन भाऊराव टेकाम वय 34 वर्ष असं या व्यक्तीचं नाव आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

निहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा 17 जून : स्वतःची दारू सोडवू न शकणाऱ्या तरुणाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (Man Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात या तरुणाने उडी घेतली. रोशन भाऊराव टेकाम वय 34 वर्ष असं या व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्ती टिळक वॉर्ड, गांधी चौक भंडारा येथील रहिवासी होता. ‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने 10 वार, बीडमधील घटना विशेष म्हणजे दारू सोडविण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवण्यात आलं होतं. रोशनला गेल्या काही वर्षांपासून दारूची सवय लागली होती. त्याची दारू सुटावी यासाठी घरच्यांनी त्याला संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात 40 दिवस ठेवलं. त्यानंतर घरी उपचार सुरू झालं. दरम्यानच्या काळात त्याची दारू बंद झाली होती, मात्र दोन महिन्यांपूर्वी गोळ्या घेणं बंद करून तो पुन्हा दारू पिऊ लागला. यामुळे त्याची मानसिक स्थिती पुन्हा बिघडली. जमीन अन् बहीण यात भावाने केली निवड; जीव जाईपर्यंत स्वत:च्या ताईवर करीत राहिला वार अनेक प्रयत्न करूनही दारू सुटत नसल्याने तो नैराश्यात गेला. नैराश्य आल्याने तो घरून कुणालाही न सांगता निघून गेला. घरच्यांनी शोध घेतला असता तो सापडला नाही. अखेर त्याचा मृतदेह शहरालगतच्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात आढळून आला आहे. या घटनेने टेकाम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती भंडारा ठाण्यात देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या