JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Yavatmal News : 5 दिवसांच्या बाळाला दिले बिब्याचे चटके, अघोरी प्रकारानं महाराष्ट्र हादरला

Yavatmal News : 5 दिवसांच्या बाळाला दिले बिब्याचे चटके, अघोरी प्रकारानं महाराष्ट्र हादरला

आजही अनेक भागांमध्ये अंधश्रद्धा बाळगली जात असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवण्याऐवजी असे अघोरी उपाय करुन बाळाचा जीव दाम्पत्याने धोक्यात घातला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

चिमुकल्याला चटके

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ : आजही काही ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये बाळ किंवा व्यक्ती आजारी असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी अघोरी प्रकार केले जातात. वारंवार आवाहन आणि जनजागृती करुनही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी त्याच्यावर अघोरी उपाय करण्यात आला. यामध्ये बाळ गंभीर जखमी झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका नवजात बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके देऊन पोटदुखीच्या त्रासावर उपाय केल्याचा प्रकार उघडकीस आला. बाळ जन्मल्यानंतर ते पोटदुखीच्या त्रासाने रडत होते. ते पाहून आईचा जीव कासावीस झाला. जन्मदात्या आई वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार केला.

Crime News : व्हिडीओ कॉलवर एक एक कपडे उतरवत होती तरुणी; तरुणाची ‘अक्कल बंद’, आणि पुढे…

6 जून रोजी घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसी मध्ये प्रसूती झाल्यानंतर आईवडील तिला घरी घेऊन गेले मात्र ती रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्लान घेता जेष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला. पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले.

Love jihad : ‘इस्लाम स्वीकार नाहीतर मी तुला गोळ्या घालीन’ 13 वर्षीय मुलीला धमकी, दोन तरुणांना अटक

संबंधित बातम्या

ह्या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. मन हेलावणाऱ्या हा अघोरी प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे.

आजही अनेक भागांमध्ये अंधश्रद्धा बाळगली जात असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवण्याऐवजी असे अघोरी उपाय करुन बाळाचा जीव दाम्पत्याने धोक्यात घातला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या