JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / महाराष्ट्रातून मुली गायब होतायेत, पुण्यापाठोपाठ अमरावतीतून शेकडो महिला-मुली मिसिंग

महाराष्ट्रातून मुली गायब होतायेत, पुण्यापाठोपाठ अमरावतीतून शेकडो महिला-मुली मिसिंग

आता राज्यापुढे एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 28 जुलै : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना या नव्या नाहीत. राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. पण तरीही महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. विशेष म्हणजे आता राज्यापुढे एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात 840 महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यातून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात तब्बल 272 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर अमरावती विभागातला हा आकडा तब्बल 812 इतका आहे. अमरावती विभागात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचा आकडा हा धक्कादायक आहे. महाराष्ट्रामध्ये महिला आणि तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे वडील पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणाऱ्या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणे शक्य नाही. यापैकी काही तरुणी आणि महिला घरी परतल्या असतील. काही पळून गेल्यानंतर लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलांसोबत लग्न लावून दिले असेल. पण ज्या मुली व महिला घरी परतल्याच नाही त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नाही. ( बीडमध्ये ‘देवमाणूस’चा फुगा फाटला, डॉक्टर निघाला कंपाउंडर, अवैध गर्भपात करणाऱ्या नराधमाला बेड्या ) अमरावती जिल्ह्यात मे, जून, जुलै या 3 महिन्यात ग्रामीण भागात 175 तर शहरी भागात 97 अशा 272 महिला व तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विविध कारणं समोर येत आहेत. पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घर सोडून जाणे ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहे. मात्र त्यामध्ये 50 टक्के महिला परत आल्याची माहिती अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली. 50 टक्के महिला परत आल्या असत्या तरी अजूनही 50 टक्के महिला बेपत्ता आहेत. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातून काही महिलांचा मानवी तस्करीसाठी सुद्धा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी वेगळे पथक करून महिलांचा तपास करावा, अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी केली आहे. जिल्ह्यानुसार बेपत्ता झालेल्या महिला व मुलींची संख्या (गेल्या तीन महिन्यांतली) : बुलढाणा 170, अकोला 103, अमरावती 272, वाशीम 76, यवतमाळ194

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या