चंदिगढ, 8 डिसेंबर: कोर्टाच्या परिसरात (Court) खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वी दोन गटात झालेल्या मारामारीत (Fight in two groups) एका महिलेला पहिल्या मजल्यावरून खाली फेकण्यात आलं आहे. या घटनेत महिला गंभीर (Woman injured) जखमी झाली आहे. कोर्टातील सुनावणीपूर्वी काही कारणावरून दोन पक्षांमध्ये वाद सुरू झाले. पाहता पाहता याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि कोर्टाच्या इमारतीतच एका महिलेला जबर मारहाण करून तिला खाली फेकण्यात आलं. काय आहे प्रकरण हरियाणातील जिंद भागात राहणाऱ्या सुरेश नावाच्या तरुणाचं 2017 साली शम्मी नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे संबंध बिघडले होते. त्यांच्यात कडाक्याची भांडणं झाली होती आणि प्रकरण न्यायालयात गेलं होतं.घटस्फोटासाठी दोघांनीही अर्ज दाखल केले होते आणि त्यावरील सुनावणीची तारीख देण्यात आली होती. दोन्ही पक्ष भिडले यावेळी सुरेश आणि त्याची बहीण सीमा हे वकिलांच्या चेंबरबाहेर उभे होते. त्यावेळी वरील मजल्यावरून शम्मी आणि तिचे नातेवाईक यांचा आवाज येऊ लागला. आक्रमक झालेल्या शम्मी आणि तिच्या नातेवाईकांनी सुरेश आणि त्याच्या बहिणीवर थेट हल्लाबोल केला. काय प्रकऱण आहे, हे पाहण्यासाठी पुढे गेलेल्या सीमाला शम्मीनं पकडलं आणि तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिने प्रत्युत्तर दिल्यावर शम्मीच्या जोडीला आणखी दहा ते बाराजण आले आणि त्यांनी सीमाला मारहाण केली. अखेर सर्वांनी मिळून तिला उचलून पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं. यात सीमा गंभीर झाली असून तिला अनेक जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा- चित्ता हेलिकॉप्टरच्या त्या अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते, आज झाला घात पोलीस चौकशी सुरू या प्रकरणी शम्मीसह 12 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कोर्टाच्या परिसरातच झालेल्या या हाणामारीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.