Home /News /national /

चित्ता हेलिकॉप्टरच्या त्या अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते, आज झाला घात

चित्ता हेलिकॉप्टरच्या त्या अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते, आज झाला घात

Bipin Rawat Helicopter Crash 2015: बिपिन रावत यांच्यासह तीन अधिकारी उत्तर-पूर्व नागालँड राज्याच्या दिमापूर जिल्ह्यात लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये होते. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात हेलिकॉप्टर कोसळले होते.

    नवी दिल्ली, 8 डिसेंबर : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर आज तामिळनाडूमध्ये कोसळले. या दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात (IAF helicopter crash in Tamil Nadu) असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी 2015 मध्येही हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते. तेव्हा बिपीन रावत लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) पदावर कार्यरत होते. बिपीन रावत यांच्यासह तीन अधिकारी ईशान्य नागालँड राज्याच्या दिमापूर जिल्ह्यात लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये होते. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात हेलिकॉप्टर कोसळले. तेव्हा हेलिकॉप्टर फक्त 20 फूट उंचीवर होते. हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली होती. तेव्हा हेलिकॉप्टर अपघाताची घटना इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. संरक्षणमंत्र्यांनी पीएम मोदींना दिली माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आजच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. हे वाचा - NDA चे विद्यार्थी ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास CDS जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा आज तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ अपघात झाला, असे भारतीय हवाई दलाने अपघातानंतर लगेचच एका निवेदनात सांगितले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे वाचा - Side effect of Amla : आरोग्यासाठी आवळा आहे बहुगुणी; मात्र अशा लोकांनी जपूनच खाणं ठरेल फायदेशीर एमआय 17 मालिका रशियन हेलिकॉप्टर सीडीएस रावत यांचे हेलिकॉप्टर हे एमआय 17 मालिकेतील रशियन हेलिकॉप्टर होते. ते वाहतूक हेलिकॉप्टर म्हणून वापरले जाते. भारतात या मालिकेतील सुमारे 150 हेलिकॉप्टर आहेत. तीन आठवड्यांपूर्वी अरुणाचलमध्ये या मालिकेचे एक हेलिकॉप्टर कोसळले होते, परंतु चालक दल थोडक्यात बचावले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Helicopter, Indian army

    पुढील बातम्या