file photo
शिवपुरी, 5 मार्च : देशात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. विवाहबाह्य संबंधातून गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या कोलारस पोलीस स्टेशन हद्दीतील बेरासिया गावातून 48 वर्षीय महिला तिच्या 24 वर्षीय प्रियकरासह पळून गेली. ही आदिवासी वस्ती आहे. महिलेला 4 मुले देखील आहेत, ज्यात दोन मुली विवाहित आहेत. महिलेच्या पतीने सांगितले की, याआधीही ही महिला तरुणासोबत पळून गेली होती, त्यानंतर ती परत आली. याबाबतची तक्रार कोलारस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या महिलेचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती असहाय पतीने पोलिसांना केली आहे. बेरासिया गावातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी भदौता गावातील 24 वर्षीय तरुणासोबत पळून गेली आहे. याआधीही ती त्याच्यासोबत पळून गेली होती. मात्र, तक्रारीच्या भीतीने ती परत आली. प्रियकराच्या नातेवाइकांनी तक्रारीच्या भीतीने महिलेला परत पाठवले होते. यानंतर 3 दिवसांपूर्वी ही महिला दुसऱ्यांदा तरुणासोबत पळून गेली. याची तक्रार आज 3 दिवसांनी कोलारस पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 13 वर्षाच्या मुलासोबत शारिरीक संबंध, 31 वर्षांची महिला गर्भवती, पण, तुरुंगवास नाही होणार नवरा अपंग, मुलाच्या लग्नाची तयारी झाली - प्रियकरासोबत पळून गेलेल्या या 48 वर्षीय महिलेचा नवरा एका पायाने दिव्यांग आहे. महिलेला 4 मुले असून त्यापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहे. यानंतर ते आपल्या मुलासाठी स्थळ शोधत होते. मात्र, दरम्यान ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली. दुसरीकडे कोलारस पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून महिलेचा शोध सुरू केला आहे.