प्रतिनिधी विजय देसाई, ठाणे 18 सप्टेंबर : मीरा भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतली. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. ही महिला काशी मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरव गॅलक्सी, नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात राहात होती. महिलेनं आपल्या मुलीसह टेरेसवरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे. या संदर्भात काशी मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मृत महिलेची पती सुरेश देवासी आपली पत्नी आणि दोन मुलांसह गौरव गॅलक्सी दुकान नंबर 1 नित्यानंद नगर समोर राहत होते. इथेच त्यांचा स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय आहे. मागील दोन-चार दिवसांपासून पत्नी रेखा देवासी सातत्याने जीव द्यावा वाटत असल्याचं म्हणत होती. माझं डोकं काम करत नाही, असं ती सांगत होती. हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांकडून भयंकर शिक्षा, 22 वर्षीय अमिनीचा दुर्देवी मृत्यू शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरेश 8 वाजता दुकानात गेला. दुपारी तीनच्या सुमारास इमारतीचा वॉचमेन दुकानात आला आणि माहिती दिली की, आपली पत्नी आणि मुलगी टेरेसवरून पडली आहे. सुरेशने लगेचच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.