20 पुरुषांशी लग्न करुन लावला चुना
श्रीनगर, 16 जुलै : जम्मू-काश्मीरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने अनेक पुरुषांशी ‘बनावट-लग्न’ करुन त्यांना लुबाडत धूम ठोकली. एकामागून एक 20 हून अधिक पुरुषांशी कायदेशीर विवाह करणारी ही महिला आता फरार असून तिचे खरे नाव, ओळख किंवा पत्ता याबाबत कोणालाच माहिती नाही. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एका महिलेचे गूढ प्रकरण तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘लुटेरी दुल्हन’ची आठवण करून देईल. जम्मू आणि काश्मीरच्या स्थानिक वृत्तपत्र कश्मीरियतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, डझनभराहून अधिक पुरुषांनी त्यांच्या पत्नींच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे संपर्क साधला. त्यावेळी सर्व फोटोत एकच महिला असल्याचे निष्पन्न झाले. या बातमीनंतर परिसरात खळबळ उडाली. बडगाम येथील रहिवासी असलेल्या पीडितांपैकी एकाने सांगितले की, एका दलालाने लग्नासाठी या महिलेचा फोटो दाखवला होता. 2 लाखात दलालाच्या माध्यमातून लग्न मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला काही शारीरिक समस्या असल्याने त्यांनी लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी दलालाला पैसे दिले होते. यासाठी कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी 2 लाख रुपये दिले. नंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांसह राजौरी गाठून हॉटेलच्या काही खोल्या बुक केल्या. मात्र, मध्यस्थ लग्नाला टाळत राहिला. लग्नानंतर फसवणूक “काही दिवसांनी, त्यांनी सांगितले की मुलीचा अपघात झाला आणि अर्धे पैसे मला परत केले. मात्र, काही तासांनंतर त्यांनी पैसे परत मागितले आणि आम्हाला दुसऱ्या मुलीचे फोटो दाखवले. पीडितेचे वडील अब्दुल अहद मीर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आम्ही लग्नाला सहमती दर्शवली तेव्हा महिलेला ईशाच्या (रात्रीच्या प्रार्थनेच्या) सुमारास आणण्यात आले. त्यानंतर कुटुंब त्याच रात्री काश्मीरला परतले. काही दिवसांनंतर महिलेने आजारी असल्याचे नाटक केलं. वाचा - लॉटरीमुळे सापडला अट्टल गुन्हेगार; हत्येच्या आरोपात 7 वर्षांपासून होता फरार रुग्णालयातून नवरी फरार, सोनेही नेले द काश्मिरियतच्या रिपोर्टनुसार, यानंतर तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जेव्हा तो अपॉइंटमेंट तिकीट काढण्यासाठी गेला तेव्हा नवरी घटनास्थळावरून गायब झाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी महिलेसाठी मेहर (हमी) म्हणून 5 लाखांहून अधिक किमतीचे सोने घेतले होते. अनेकांनी घातला गंडा दुसर्या पीडितेच्या भावाने सांगितले की, एका मध्यस्थाने महिलेला रात्री दाखवले आणि त्याच सुमारास लग्न झाले. पीडितेच्या भावाने सांगितले की, ‘ती फक्त दहा दिवस चादुरा बडगाम येथे घरी होती, मात्र त्यानंतर ती हॉस्पिटलमधून पळून गेली. आणखी एक पीडित मोहम्मद अल्ताफ मीर, जो मध्य काश्मीरमधील बडगामचा रहिवासी आहे, त्याने सांगितले की त्यानेही त्याच महिलेशी लग्न केले होते. पीडितेने सांगितले की, महिलेची कागदपत्रे बनावट निघाली. त्यामुळे तिचे खरे नाव कधीही उघड झालं नाही. ही महिला एका रात्री घरातील सर्व सामान घेऊन घरातून गायब झाली.