JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीने पतीला चहातून दिलं विष; रुग्णालयात गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला!

पत्नीने पतीला चहातून दिलं विष; रुग्णालयात गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला!

तरुण रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकती गंभीर आहे. अशा अवस्थेतही तो पत्नीचा फोटो काढून पाहत असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 30 जानेवारी : छतरपूरमधील एका पत्नीने आपल्या पतीच्या (Husband and wife) चहात विष घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध (Extra Marital Affair) होते. यामुळे पतीला मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा प्लान आखला. ही घटना छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे राहणारा प्रमोद विश्वकर्माने सांगितलं की, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. पत्नीला त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकत नसल्याचं पीडित तरुणाने सांगितलं. हे ही वाचा- Shocking! मैत्रिणीने दिला दगा; पोलीस अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये केली आत्महत्या तरुणाने पत्नीचे कृत्य आपल्या कुटुंबीयांनाही दिली. ते ही तिला वारंवार सांगत होते. मात्र पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचं सांगून पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. मात्र पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा नाही. त्यांच्या लग्नाला 8 ते 9 वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलंही आहेत. त्यामुळे पती कायम पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. आता मात्र पत्नी पतीला मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पत्नीने चहामध्ये विष दिल्याचा दावा पतीने केला आहे. मात्र तरीही प्रमोद आपल्या सुंदर पत्नीला सोडू इच्छित नाही. रुग्णालयात असतानाही तो आपल्या पत्नीचा फोटो पाहत राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या