JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत पोहोचला नवरा, बायकोला माहिती झालं अन् मग काय, लोक पाहतच राहिले!

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत पोहोचला नवरा, बायकोला माहिती झालं अन् मग काय, लोक पाहतच राहिले!

पती आणि प्रेयसी हॉटेलमध्ये असताना धक्कादायक घटना घडली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरठ, 14 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच अनैतिक संबंधांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पती आणि त्याची प्रेयसी हॉटेलमध्ये असताना पत्नीने प्रवेश केला. यानंतर याठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा घडला.

मेरठमधील एका हॉटेलमध्ये पती आणि त्याच्या प्रेयसी असल्याची माहिती पत्नीला मिळताच पत्नीने हॉटेल गाठून त्यांना जोरदार मारहाण केली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मात्र, यावेळी पोलिसांनी समजूत काढत तिघांनाही त्यांच्या घरी पाठवले. लव्ह बाइट हॉटेलच्या तेजगढी चौकीपासून मेडिकल स्टेशन परिसर फक्त 200 मीटर अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावनापूर येथील एक तरुण आपल्या प्रेयसीसह तेजगढी चौकीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या लव्ह बाइट हॉटेलमध्ये पोहोचला होता. पती प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये असल्याची माहिती पत्नीला मिळाली. त्यानंतर महिला हॉटेलमध्ये पोहोचली आणि जोरदार ड्रामा घडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महिलेने पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. यादरम्यान पती प्रेयसीला वाचवण्यासाठी आला असता पत्नीने पतीलाही चोप दिला. या गोंधळाची माहिती मिळताच तेजगढी चौकी पोलीसही घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर चौकी पोलिसांनी महिला आणि तिचा पती यांच्यात समझौता केला. तर यावेळी लव्ह बाइट हॉटेलचा मालक आशू हॉटेल बंद करून घटनास्थळावरून पळून गेला होता. हॉटेलमध्ये दररोज असेच नाट्य घडत असल्याचा आरोप आजूबाजूच्या लोकांनी केला. मात्र, हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार करूनही तेजगढी चौकी पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या