मुनिराबाद, 25 जुलै : कर्नाटकातील कोप्पल तालुक्यातील मुनिराबाद शहरात रस्त्यावर झोपलेल्या अनेक यात्रेकरूंना एका मिनी मालट्रकने चिरडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा हुलीगेम्मा मंदिरासमोर घडली. काय आहे संपूर्ण घटना - या घटनेतील मृताचे नाव थिप्पाण्णा (वय 75) असे नाव आहे. तर इतर तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर बघ्यांनी वाहनाचा पाठलाग केला. मात्र, चालक घटनास्थळावरून पळून गेला. व्हिडिओत काय - व्हिडिओमध्ये, वाहनाच्या मागे उभ्या असलेल्या काही लोकांसह एक मिनी मालट्रक रस्त्याच्या कडेला झोपण्याच्या तयारीत असलेल्या किमान आठ यात्रेकरूंकडे हळू हळू येताना दिसला. त्यांच्यापैकी काहींना वाहन त्यांच्या दिशेने येताना दिसले आणि त्यांनी तिथून दुसऱ्या बाजूला उडी मारली. मात्र, काही जण यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे परिणामी एकाचा मृत्यू आणि इतर जण जखमी झाले. तसेच यात्रेकरूंना खाली उतरवल्यानंतर चालक वेगाने पळताना दिसत आहे.
हेही वाचा - हॉटेल नावावर न केल्याने मुलगा नाराज, आई-वडिलांसोबत केलं धक्कादायक कृत्य या घटनेनंतर बघ्यांनी वाहनाचा पाठलाग केला. मात्र, चालक घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत होता. जेव्हा यात्रेकरूंसाठी उपलब्ध केलेल्या सर्व खोल्या व्यापल्या जातात, तेव्हा भाविक सहसा मंदिराबाहेर झोपतात, असेही स्थानिकांनी सांगितले. याप्रकरणी मुनिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे.