जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हॉटेल नावावर न केल्याने मुलगा नाराज, आई-वडिलांसोबत केलं धक्कादायक कृत्य

हॉटेल नावावर न केल्याने मुलगा नाराज, आई-वडिलांसोबत केलं धक्कादायक कृत्य

आरोपी मुलगा

आरोपी मुलगा

आपल्या मुलाच्या या सवयीमुळे चंद्रभान आणि निशा खूप निराश होते. त्यांच्या नातेवाईकांनाही मुलाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही.

  • -MIN READ Haryana
  • Last Updated :

रोहतक, 25 जुलै : हरयाणाच्या रोहतक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 23 जुलै रोजी सकाळी जनता कॉलनीत हॉटेलचालक दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याच्या मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या कसून चौकशी केल्यावर हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता नावावर केली नाही म्हणून रागातून त्याने आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली. तसेच हत्येनंतर तो पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून दोन रिव्हॉल्वरही जप्त केल्या आहेत. सध्या कोर्टातून त्याचा रिमांड घेण्यात येणार आहे. यामुळे जेणेकरून संपूर्ण घटनेचा उलगडा होऊ शकेल. रोहतकचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार लोहछाब यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घटनेचा खुलासा केला. एकुलता एक मुलगा तरुण याने आपल्या आईवडिलांची हत्या केली. आरोपी मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन असून तो जुगारही खेळायचा. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्याच्या वडिलांच्या नावावर असलेले तारा हॉटेलला वडिलांचे नाव देण्याची मागणी त्याने केली होती. जेणेकरून तो आपली व्यसन पूर्ण करण्यासाठी ते विकून कर्ज फेडू शकेल. तसेच त्याने यासंदर्भात आई-वडिलांशी भांडण केले. हेही वाचा -  हिंदू वेशात मुस्लीम तरुणांकडून 3 दर्ग्यांमध्ये तोडफोड; वातावरण बिघडवण्यासाठी रचला मोठा कट आपल्या मुलाच्या या सवयीमुळे चंद्रभान आणि निशा खूप निराश होते. त्यांच्या नातेवाईकांनाही मुलाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. घटनेच्या रात्रीही दारूच्या नशेत त्याचे आई-वडिलांशी जोरदार भांडण केले आणि त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या पत्नीच्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि खाली उतरून आई-वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीनेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात