JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Pune News : धूम स्टाईलने बाईक पळवणाऱ्यांचा आला संशय; पडकल्यानंतर पुण्यातील मोठ्या केसची झाली उकल

Pune News : धूम स्टाईलने बाईक पळवणाऱ्यांचा आला संशय; पडकल्यानंतर पुण्यातील मोठ्या केसची झाली उकल

Pune News : वडगाव मावळ पोलिसांनी धुम स्टाईलने पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत त्यांना जेरबंद केलं आहे.

जाहिरात

वडगांव मावळ पोलीस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 31 मे : मागील काही दिवसांपासून पुण्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशात धुम स्टाईलने गाडी पळवणाऱ्या तरुणांचा संशय आल्याने पोलिसांनी पकडल्याने मोठी केस उलगडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएसके यांच्या महागड्या विदेशी दुचाकी चोरणारी टोळी वडगाव मावळ पोलिसांनी जेरबंद केली. डीएसके कारागृहात असून त्यांचे गोडाउन हे मावळातील टाकवे गावात असून युनियन बँकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मावळात असलेले हे गोडाउन मागील वर्षी जून 2022 ला फोडून या टोळीने महागड्या विदेशी स्पोर्ट्स मोटरबाईक गाड्या धूम स्टाईलने चोरून पोबारा केला होता. हरिदास सीताराम चवरे, परशुराम सरडे, तूफैल खान आणि इम्रान खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नऊ लाख पन्नास हजारांच्या पाच स्पोर्ट्स मोटरबाईक आणि एक साडेचार लाखांची पीक अप व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे. पाठलाग करत आरोपींच्या आवळल्या मुसक्या विदेशी मोटर बाईक ज्यांचे हप्ते थकले होते. युनियन बँकेच्या ताब्यात असलेल्या गोडाउनमधून चार चोरट्यांनी हात साफ केला. मात्र, महागड्या असलेल्या या गाड्या रजिस्ट्रेशन नसल्याने या चोरांची मोठी अडचण झाली होती. वडगांव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या वर्षी जून 2022 ला टाकवे गावात बंद असलेल्या कंपनी गोडाउन फोडून महागड्या 5 विदेशी गाड्या लंपास केल्या होत्या. त्याबाबत तपास करत असताना वडगांव मावळ पोलिसांना चोरांची चाहूल लागली. विदेशी गाड्या धूम स्टाईलने फिरवत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, सचिन गायकवाड आणि सचिन काळे हे गस्तीवर असताना बेनली मेड जर्मनी या विदेशी मोटरबाईकसह चोरांच्या मुसक्या पोलिसानी आवळल्यात. वाचा - पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय, हैवान बापाने मुलीच्या डोक्यात दिलं इंजक्शन युनियन बँकेचे अधिकारी दीपक ताराचंद यांनी गोडाउन फोडून गाड्या चोरल्याची तक्रार वडगांव मावळ पोलिसांत दिली होती. त्यानुसार वडगांव पोलिसांचा तपास सुरू होता. या तपासादरम्यान लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी वडगांव पोलिसांना मोटार बाईक चोरांचा पाठलाग करण्याचा कानमंत्र देताच चोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. वडगांव मावळ न्यायालयात आरोपींना हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या