उत्तराखंडमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पवनसिंह कुंवर (उत्तराखंड), 09 मे : उत्तराखंडमधील हल्दवानी शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शहरातील बनभूलपुरा भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 13 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागच्या 8 महिन्यांपूर्वी 35 वर्षीय व्यक्तीने मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या युवतीच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाइकांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता मुलीने एका अपत्याला जन्म दिला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखू लागल्याने मुलीच्या नातेवाईकांनी तिला उत्तराखंडच्या सुशीला तिवारी रुग्णालयात दाखल केले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
सासरकडच्या लोकांनी केले जावयाचे अपहरण, अन् घडलं भयानक कांडयानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीच्या गर्भधारणेची माहिती दिली. दुसरीकडे प्रसूती वेदनांमुळे मुलीने एका अपत्याला जन्म दिला. यामुळे नातेवाईकांसह सर्वांनाच धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी पीडितेला याबाबत विचारले असता, तिने सांगितले की, 8 महिन्यांपूर्वी तजमुल नावाच्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे ती मुलगी घाबरून कोणाला बोलली नाही.
यावेळी पोलीस अधिकारी म्हणाले की, पीडितेच्या भावाने याबाबत तक्रार दिली आहे, ज्याच्या आधारे ताजमुल विरुद्ध POCSO आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुलीच्या नावाने बनवलं फेसबुक अकाऊंट, फक्त गंडवलंच नव्हे तर तरुणाचा विषयच संपवलाचौकशीत तजमुलने आपला गुन्हा मान्य केला आहे. याबाबत त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास करत आहेत.