महाराजगंज, 19 नोव्हेंबर: मंदिरात पूजा करणारे वृद्ध पुजारी आणि वृद्ध साध्वी (Sadhvi Killed in Uttar Pradesh) यांची त्याच मंदिरातल्या हत्तीच्या मूर्तीचे वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Crime Update) आज (19 नोव्हेंबर) उघडकीस आली आहे. महाराजगंजमधल्या (Maharajganj) महदेईया (Mahadeiya) नावाच्या गावातल्या दुर्गामाता मंदिरात गुरुवारी रात्री (18 नोव्हेंबर) ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रामरतन मिश्रा (73) आणि कलावती (68) अशी मृत पुजारी आणि साध्वी यांची नावं आहेत. रामरतन मिश्रा (Ram Ratan Mishra) अविवाहित होते. त्यांनी आपल्या महदेईया गावात अनेक वर्षांपूर्वी स्वखर्चाने दुर्गामाता मंदिर (Durgamata Temple) उभारलं होतं. तेच मंदिरात पूजा करायचे. तसंच, मूळची नेपाळमधल्या धकढाई चेनपुरवा इथली असलेली कलावती नावाची महिला गेल्या 25 वर्षांपासून या मंदिरातच राहून पूजा-पाठ करायची. गावकरी त्या महिलेला साध्वी म्हणून ओळखायचे आणि मानसन्मानही द्यायचे. हे वाचा- पुणे: चिमुकल्याला विष पाजून संपवलं; न्यायालयानं आईला दिली आयुष्यभराची शिक्षा काही दिवसांपूर्वीच रामरतन मिश्रा यांनी वाराणसीतून हनुमानाची मूर्ती आणून ती या मंदिरात स्थापन केली होती. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांनी भंडाराही केला होता. शुक्रवारी (19 नोव्हेंबर) नेहमीप्रमाणे गावकरी सकाळी मंदिरात आले, तेव्हा त्यांना रामरतन मिश्रा आणि कलावती (Sadhvi Kalavati) यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसते. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही प्रचंड मारहाण झाली असल्याचा अंदाज घटनास्थळाची परिस्थिती पाहून येत होता. मंदिरात ठेवलेली हत्तीची छोटी प्रतिमा घेऊन या दोघांवर वार करण्यात आले असावेत. हे वाचा- एकट्या मुलीला पाहून घरात शिरले चौघे अन् अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार या घटनेमागचं नेमकं कारण काय असावं, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातच काही देण्याघेण्यावरून वाद झाले असावेत आणि त्यातच या दोघांची हत्या करण्यात आली असावी. या घटनेमागचा दुसराही एक संभाव्य पैलू पुढे येत आहे. रामरतन मिश्रा यांना दोन भाऊही आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची जमीन विकली गेली होती. त्यात मोबदला म्हणून त्यांनाही 14 लाख रुपये मिळाले होते. या पैशांच्या व्यवहारावरून काही तंटा उत्पन्न झाला असावा आणि त्यांची हत्या झाली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.