JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कपलसोबत अज्ञातांचं अजब कृत्य; तरुणाचं बोट दगडाने ठेचून तरुणीच्या भांगेत भरलं रक्त, अन् मग...

कपलसोबत अज्ञातांचं अजब कृत्य; तरुणाचं बोट दगडाने ठेचून तरुणीच्या भांगेत भरलं रक्त, अन् मग...

तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. यानंतर या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 27 ऑगस्ट : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. यानंतर या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी दोघांचेही औपचारिक आणि कायदेशीर पद्धतीने लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेरमध्ये सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अज्ञात लोक एका जोडप्याचं जबरदस्तीनं लग्न लावताना दिसत आहेत. कोल्हापूर : इन्स्टाग्रामवर ओळखीतून लग्नाचे आमिष, नंतर अल्पवयीन मुलीला पळवून नेत आठ दिवस धक्कादायक प्रकार खरगपूर तलावाला भेट देण्यासाठी एक जोडपं आलं होतं. लोकांनी यातील तरुणाचं लोकांनी बोट कापलं, त्यानंतर हे रक्त तरुणीच्या डोक्यात लावण्यास सांगितलं. तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पाहून कुटुंबीयांनी बदनामीपासून वाचण्यासाठी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली असता, हा व्हिडिओ हवेली खडगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खडगपूर तलावाजवळील असल्याचे समोर आले. हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. हा व्हिडिओ 21 ऑगस्टचा आहे. तरुण आणि तरुणी खरगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी गेले होते. दोघांचं दोन महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाचं नाव मिथलेश कुमार असं आहे. मिथलेश हा बरियारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहादूरपूर येथील रहिवासी महेश प्रसाद गुप्ता यांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी प्रेमी युगुल तलावावर गेले होते. तिथे अज्ञात युवकांनी मुलीला आणि तरुणाला एका झुडपाजवळ बसवून त्यांची विचारपूस सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपींने खोटे आरोप करत आधी मुलाचे बोट दगडाने ठेचले आणि नंतर मुलीच्या भांगात कुंकू भरलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या