वाशिम, 20 फेब्रुवारी: पोलिओचा चुकीचा डोस (wrong dose of polio) दिल्यामुळे दोन महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगरूळपीर तालुक्यातील निंबी येथे घडली. दरम्यान श्रुष्टी आडे या बाळाला 8 फेब्रुवारी पोलिओचा डोस दिला. त्यानंतर श्रुष्टीचा मेंदू काम करत करत नव्हता. तिचा मेंदू बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल केलं. मात्र 15 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिओचा डोस घेण्याआधी श्रुष्टीची तब्येत ठणठणीत होती. पोलिओचा डोस देण्याआधी चार इंजेक्शन दिले आणि नंतर पोलिओचा डोस दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘‘संजय राऊतांना आवारा, ते सैरभैर झालेत’’, भाजपचं आक्षेपार्ह भाषेवर उत्तर मृत बाळाचे वडील केशव आडे यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तसंच आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महिला नर्स आणि सहयोगी डॉक्टर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार आरोग्य विभागाकडे केली आहे. या संदर्भात डॉक्टरांना विचारले असता पोलिओचा डोस हा सरकारच्या नियमानुसार दिला जातो. श्रुष्टीला पोलिओचा डोस 8 फेब्रुवारीला गावात देण्यात आला. तिच्यासोबत इतर ही मुलांना हा डोस दिला. मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळं हा मृत्यू पोलिओचा डोस झाला नसावा असे जिल्हा साथरोग आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ मोबिन खान यांनी सांगितलं आहे. Ranji : सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते दिल्लीच्या 19 वर्षांच्या खेळाडूनं करून दाखवलं! पोलिओसारखे आजार होऊन भविष्यात अपंगत्व येऊ नये यासाठी सरकारकडून दरवर्षी पोलिओचे डोस दिले जातात. मात्र नर्स आणि सहयोगी डॉक्टरच्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या पोलिओचा डोसमुळे दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आता आरोग्य विभाग चौकशी करून दोषींवर कारवाई करेल. ही मात्र श्रुष्टीचा गेलेला जीव परत येईल का असा प्रश्न तिच्या आई वडील आणि नातेवाईकांकडून विचारला जात आहे.