रूहान शेख आणि बंदी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्यात बंदी याला मारहाण झाली होती.
प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 13 नोव्हेंबर : नवी मुंबईमध्ये दोन गटामध्ये जबर मारामारीची घटना घडली. या घटनेमध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. पूर्ववैमन्यस्यातून ही घटना घडल्याचे सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कोपर खैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घणसोली सेक्टर 4 मधील बालाजी दर्शन सोसायटी समोरील रस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. यात एका गटातील तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या गटातील दोन जण जखमी झाले आहेत.गंभीर जखमींना उपचारसाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केले असून उर्वरित जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून रात्री उशिरा कोपर खैरणे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (आई लग्न लावून देत नसल्याने नाराज झाला मुलगा; हॉरर चित्रपट बघून रचला भयानक कट, अन्…) रूहान शेख आणि बंदी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्यात बंदी याला मारहाण झाली होती. त्याचाच राग मनात धरून बंदी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शेख याच्या गटावर हल्ला केला. दोन्ही बाजूने तुंबळ हाणामारी झाली. यात रुहान याने आपल्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने बंदी आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांवर हल्ला केला. साथीदार नसीर शेख यांच्या छातीवर चाकू भोसकून त्याला ठार केले तर इतरांना मारहाण केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने लाकडी बांबू, बॅटने हल्ला करून त्याच्या डोक्यात, हातावर आणि पायावर जोरदार प्रहार करून जीवघेणा प्रयत्न केला असता त्यात दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. (नागपूर : जन्मदात्याकडूनच भयानक कांड, 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून रचला अपहरणाचा कट) दोन्ही बाजूने एकामकांवर झालेल्या झालेल्या हल्ल्यात एकजण ठार तर एकूण चारजण जखमी झाले असून,मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्ण्यालयात पाठविण्यात आला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करून भा.द.वी. कलम 302,307 व इतर गुन्हे दाखल केले असून,कोपर खैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.