JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गँगस्टर छोटा शकीलच्या 3 साथीदारांना मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

गँगस्टर छोटा शकीलच्या 3 साथीदारांना मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

50 लाखांच्या खंडणीप्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. याच प्रकरणात ही कारवाई केली गेली. यात तिघांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 ऑगस्ट : डी कंपनी आणि छोटा शकीलच्या साथीदार असल्याचं सांगणाऱ्या आरोपींच्या घरी मुंबई गुन्हे शाखेनं छापा टाकला. यात सुरतमध्ये राहणाऱ्या आरिफ बेग मिर्झा, इलियास कपाडिया आणि अस्लम नवीवाला यांच्या घराची झडती घेतली गेली. 50 लाखांच्या खंडणीप्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. याच प्रकरणात ही कारवाई केली गेली. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. YouTube पाहून अल्पवयीन मुलाने बनवली वाईन; प्यायल्यानंतर मित्राची झाली भयंकर अवस्था सुरतच्या रांदेर पोलिसांना सोबत घेऊन मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथून तिघांना एका व्यावसायिकाकडून ५० लाख रुपये उकळल्याप्रकरणी आणि गँगस्टर छोटा शकीलशी संबंध दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार त्याने एका आरोपीला 13 कोटी रुपये दिले होते. परंतु त्याला पैसे परत करण्याऐवजी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह व्यापाऱ्याला धमकावलं आणि खंडणीचा प्रयत्न केला. कपाडिया आणि बेग यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि ते फरारी गुंड दाऊद इब्राहिम चालवत असलेल्या ‘डी कंपनी’ या गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित आहेत, असे व्यावसायिकाने सांगितलं. मुलीच्या लग्झरी घरात पैशांचा डोंगर, मात्र अर्पिता मुखर्जींच्या 50 वर्षीय आईचा जर्जर घरात निवारा ४५ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, वेगवेगळ्या लोकांकडून पैसे गोळा करून त्यांनी नवीवाला यांना त्यांच्या व्यवसायासाठी १३ कोटी रुपये दिले होते. नंतर जेव्हा-जेव्हा त्यांनी नवीवालाकडे पैसे परत मागितले तेव्हा त्याने नकार दिला. नवीवाला, कपाडिया आणि मिर्झा गँगस्टर छोटा शकीलचे नाव घेऊन व्यावसायिकाला धमकावत असत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या