राहुल खंदारे, बुलडाणा 26 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. चोरांनी जिल्ह्यातील काही प्रमुख परिसरात हैदोस घातला आहे. अशातच जिल्ह्यातील खामगावच्या बसस्थानकावरून तिकीटांचा ट्रे चोरीला गेल्याची अजब घटना समोर आली. तिकीट असलेला ट्रे आणि 300 रुपये रोख तसंच 20 हजार 155 मूल्य असलेल्या तिकीटाची बॅग अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना खामगाव येथे रहवासी असलेले गजानन सोनोने एसटी महामंडळात वाहक आहेत त्यांनी मेहकर येथे जाण्यासाठी एसटी बस स्थानकात लावली आणि तिकीट बॅग कॅबिनमध्ये ठेवली. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने चक्क 20 हजारांचे तिकीट असलेली बॅग चोरली. बॅग चोरी गेल्याचं लक्षात येताच सोनोने यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरट्याने तिकिटाची बॅग का चोरली असावी? असा प्रश्न सुरुवातीला सगळ्यांना पडला. धक्कादायक! जिथे चोरी करायला गेला तिथेच मिळाली मृत्यूची शिक्षा काहीवेळानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पैशांची बॅग समजून या चोरट्याने प्रवासी तिकिटांची बॅग पळवून नेली होती. या अजब घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले. तिकिटांची बॅग चोरण्यामागे काय उद्देश असावा? असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र, गोंधळलेल्या चोरट्याने पैशांची बॅग समजून तिकिटांची बॅग लंपास केल्याचं समोर आल्याने याबद्दल एकच चर्चा रंगली.