JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; हातावर असं काही लिहिलं की, अधिकारीही हैराण! 

तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; हातावर असं काही लिहिलं की, अधिकारीही हैराण! 

भोपाळ, 12 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) अशोकनगरमध्ये तरुणाच्या आत्महत्येची चर्चा सुरू आहे. तरुणाने ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाशेजारी एका कागद सापडला आणि हातावरही काहीतरी लिहिलं होतं. यावर त्याने मृत्यूचं कारण लिहिलं आहे. पोलिसांनी सुसाइड नोट पाहिल्यानंतर तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोकनगरच्या त्रिलोकपुरी कॉलनीत राहणाऱ्या 26 वर्षीय भूपेंद्र महेंद्र दांगीने ट्रेनच्या समोर आत्महत्या केली. भुपेंद्र काही दिवसांपासून एका डॉक्टरकडे ड्रायव्हरचं काम करीत होता. मात्र अचानक मजुरीचं काम करू लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 12 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) अशोकनगरमध्ये तरुणाच्या आत्महत्येची चर्चा सुरू आहे. तरुणाने ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाशेजारी एका कागद सापडला आणि हातावरही काहीतरी लिहिलं होतं. यावर त्याने मृत्यूचं कारण लिहिलं आहे. पोलिसांनी सुसाइड नोट पाहिल्यानंतर तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोकनगरच्या त्रिलोकपुरी कॉलनीत राहणाऱ्या 26 वर्षीय भूपेंद्र महेंद्र दांगीने ट्रेनच्या समोर आत्महत्या केली. भुपेंद्र काही दिवसांपासून एका डॉक्टरकडे ड्रायव्हरचं काम करीत होता. मात्र अचानक मजुरीचं काम करू लागला. भूपेंद्रचा मोठा भाऊ राजू दांगीने सांगितलं की, शुक्रवारी सकाळी भूपेंद्र मजुरी करण्यासाठी घराबाहेर पडला. यानंतर ASI विनोद तिवारीने त्याला पकडून मारहाण केली. भूपेंद्रने सर्वात लहान भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्याला पोलिसांकडून त्रास होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं. राजू म्हणाला की, एएसआय विनोद तिवारी याने माझा भाऊ भूपेंद्र याला यापूर्वीही अनेकदा पकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या चर्चेनंतर भूपेंद्र रात्री घरी परतलाच नाही. पहाटे चारच्या सुमारास त्रिलोकपुरी कॉलनीतच भूपेंद्रचा मृतदेह रेल्वे रुळावर पडून असल्याची खबर पोलिसांना मिळाली. शेवटी त्याने आत्महत्या केली आहे. तपासात भूपेंद्रजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने एएसआय विनोद तिवारी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. मृताने हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि एक कागदही ठेवला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, एएसआय त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता, या चिंतेने आत्महत्या करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या