उदयपुर, 15 नोव्हेंबर : उदयपुरमध्ये (Udaipur) तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह (DeadBody) मिळण्याचं गूढ पोलिसांनी सोडवलं आहे. पतीने (Husband) दारू प्यायल्यानंतर महिलेची हत्या केली. पत्नीची (Wife) हत्या करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात विहिरीत ढकलल्यानंतरही ती बचावली होती. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत पतीने उघड केले आहे की, पत्नी दिवसभर फोनवर बोलत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्याने तिची हत्या केली. एसएचओ कमलेंद्र सिंह यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान पती दौलत सिंहने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, तो पत्नीसोबत घरात आधी दारू प्यायला. त्यानंतर दारूच्या नशेत तिच्या डोक्यात काठीने वार करून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केला. यासोबतच त्यांनी फोन फ्लाइट मोडवरही ठेवला, त्यामुळे लोकेशन ट्रेस होऊ शकले नाही. हे ही वाचा- Beed : बापानेही वाचवलं नाही, 6 महिन्यात 400 जणांनी केला लेकीवर बलात्कार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी एका महिलेचा मृतदेह खड्डात पडल्याची माहिती मिळाली होती. गोगुंडा पोलिसांनी कसून तपास केला असता खुनाचे प्रकरण समोर आले. हेमा चौहान असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी नवऱ्याची चौकशी केली. मात्र ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी हायवेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेह मिळाल्याच्या एक दिवस आधी रात्री पती दौलत सिंह कारमधून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी दौलतला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याचा स्वीकार केला आहे. तपासात समोर आलं आहे की, दौलत सिंह बऱ्याच काळापासून हेमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पत्नी बराच काळ लोकांशी फोनवर बोलायची… खरंतर हेमा खूप वेळ फोनवर लोकांशी बोलायची. त्यामुळे पतीचा संशय बळावला. अनेकवेळा दौलतसिंगने मारहाणही केली. दरम्यान, हेमाने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा केला आहे.