छत्तीसगड, 3 सप्टेंबर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) कोंडागाव जिल्ह्यातून एका सरकारी शाळेतील (Government School) शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मारहाण केल्यामागील कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या प्रकारानंतर शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जन्माष्टमीनिमित्त (Janmashtami ) शाळेच्या मुलांनी उपवास (Fasting) ठेवल्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे वृत्त समोर आल्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकाचं निलंबन केलं. चरण मरकाम हे रायपूरपासून 200 किमी दक्षिणेकडील कोंडागावमधील गिरोला भागातील एका सरकारी शाळेत शिकवित होते. काही दिवसांपूर्वी पंचायत आणि गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही घटना समोर आली. या शाळेतील शिक्षकाने सातवी आणि आठवीच्या वर्गातील मुलांना मारहाण केली होती. यानंतर बुधवारी या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं. हे ही वाचा- 8 महिने हॉटेलमधील सुपर डिलक्स खोलीत केली जीवाची मुंबई; 25 लाखांचं बिल पाहिलं आणि मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारलं की ज्यांनी जन्माष्टमीनिमित्त उपवास ठेवला आणि देवाचं अनुष्ठान केलं त्यांनी हात वर करा. ज्यांनी उपवास केला होता, त्यांना शिक्षकाने मारहाण केली. प्राथमिक रिपोर्ट मिळाल्यानंतर शिक्षकाचं निलंबन करण्याच आलं. अद्याप या शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. जिल्हा प्रशासानाकडून रिपोर्ट मिळाल्यानंतर यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.