मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

8 महिने हॉटेलमधील सुपर डिलक्स खोलीत केली जीवाची मुंबई; 25 लाखांचं बिल पाहिलं आणि...

8 महिने हॉटेलमधील सुपर डिलक्स खोलीत केली जीवाची मुंबई; 25 लाखांचं बिल पाहिलं आणि...

या पठ्ठ्याने हॉटेलमधील दोन सुपर डिलक्स खोल्या बुक केल्या होत्या.

या पठ्ठ्याने हॉटेलमधील दोन सुपर डिलक्स खोल्या बुक केल्या होत्या.

या पठ्ठ्याने हॉटेलमधील दोन सुपर डिलक्स खोल्या बुक केल्या होत्या.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 3 सप्टेंबर : मुंबईतील (Mumbai) हॉटेलमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. याबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. मुंबईतील एक व्यक्ती हॉटेलचं तब्बल 25 लाखांचं बिल न भरता फरार झाल्याचा आरोप आहे. ही व्यक्ती गेल्या 8 महिन्यांपासून आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत येथे राहत होती. त्याचं एकूण बिल 8 लाखांपर्यंत पोहोचलं होतं. मात्र ही व्यक्ती बिलाची रक्कम न देता फरार झाल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे.

दोन डिलक्स खोल्या केल्या होत्या बुक

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने नवी मुंबईत (Navi Mumbai) 8 महिन्यांपूर्वी चेक इन केलं होतं. त्याच्यावर हॉटेल व्यवस्थापनाने आरोप केला आहे की ही व्यक्ती 25 लाखांचं बिल न भरता फरार झाली आहे. ही व्यक्ती खोलीच्या बाथरूममधील खिडकीतून फरार झाली. आरोपीचं नाव मुरली कामत (Murli Kamat) असल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती मूळत: अंधेरी येथील राहणारी आहे. त्याने हॉटेलमध्ये स्वत:ची ओळख स्पष्ट करण्यासाठी पासपोर्ट (Passport) जमा केला होता. तो गेल्या 8 महिन्यांपासून खारघर भागातील एका हॉटेलमध्ये राहत होता. त्याने हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा-रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 24 वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्यानं खळबळ

सिने क्षेत्रात काम करीत असल्याचं सांगितलं होतं

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, मुरली कामत पहिल्यांदा गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी हॉटेलमध्ये आला होता. तो चित्रपट क्षेत्रात काम करीत असल्याचं हॉटेल स्टाफला सांगितलं होतं. त्याने हॉटेलमध्ये दोन सुपर डिलक्स खोल्या बुक केल्या होत्या. मुरलीने एक खोली राहण्यासाठी आणि दुसरी खोली मिटींग आदी कामासाठी ठेवली होती. जेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्याकडून बिलाचे पैसे मागितले तर त्याने एक महिन्यात देतो असं सांगितलं.  याबाबत वारंवार हॉटेल व्यवस्थापनाकडून विचारणा केली जात होती. त्या दिवशी जेव्हा हॉटेलचे कर्मचारी त्याच्या खोलीत गेले तर तो खोलीतून फरार झाला होता. आरोपीने आपला मोबाइल, लॅपटॉप खोलीतच ठेवले होते. या प्रकरणात हॉटेल व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai